आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Chamber Corruption Case News In Marathi, Maharashtra

समीर भुजबळ यांची एसीबीकडून चौकशी, महाराष्ट्र सदन भ्रष्टाचार प्रकरणी विचारले 16 प्रश्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम प्रकरणी झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर यांची साडेतीन तास कसून चौकशी केली. भुजबळ आणि त्यांचे पुत्र पंकज यांची सोमवारी चौकशी होईल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात छगन भुजबळ यांच्या पत्नी मीना, समीर यांच्या पत्नी शेफाली, पंकज यांच्या पत्नी विशाखा यांचीही चौकशी केली जाणार आहे.
समीर यांना एसीबीने गेल्या आठवड्यातच समन्स बजावले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसीबीने तब्बल १५० मुद्द्यांची एक प्रश्नावली तयार केली अाहे. समीर यांना ते संचालक असलेल्या कंपन्यांशी संबंधित १६ प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती एसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यांनी या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिल्याचेही हा अधिकारी म्हणाला. साेमवारी त्यांची पुन्हा चाैकशी हाेईल.