आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis Loses Weight, Gains Respect

राजकीय वजन वाढलेल्या मुख्यमंत्र्यांचे 3 महिन्यात 18 किलो वजन घटलं!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सहा महिन्यापूर्वीचे (उजवीकडे) आणि आताचे (डावीकडे) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. - Divya Marathi
सहा महिन्यापूर्वीचे (उजवीकडे) आणि आताचे (डावीकडे) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंबई- गेल्या महिन्यात भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याइतकीच असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय वजन वाढल्याचेही बोलले गेले. मात्र, फडणवीस हे एकीकडे आपले राजकीय वजन वाढवत असतानाच आता शारीरिक वजन कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 44 इंच कंबरेचा मुख्यमंत्री म्हणून विरोधकांसह सोशल मिडियावर टिंगलटवाळी झाल्यानंतर फडणवीस यांनी आपले शारीरिक वजन कमी करण्याचे मनावर घेतले. आता त्यांच्या या प्रयत्नांना यशही येत असल्याचे दिसून येत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस मागील तीन महिन्यांपासून आपले वाढत चाललेले वजन कमी करीत आहेत. तीन महिन्यांपूर्वी फडणवीस यांचे वजन तब्बल 122 किलो इतके होते. आता ते 104 किलोवर आले आहे. याचाच अर्थ मुख्यमंत्र्यांनी आपल्या कामाचा व्याप संभाळत तीन महिन्यात तब्बल 18 किलो वजन कमी करून दाखवले आहे. आगामी काळातही मुख्यमंत्र्यांना आणखी 18 किलो वजन कमी करून ते 90 किलोपेक्षा कमी करायचे आहे. मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता यांनी मागील काही दिवसापूर्वी 6 किलो वजन कमी केले होते. त्यातून प्रेरणा घेऊन मुख्यमंत्र्यांनीही वजन कमी करण्याचे मनावर घेतले. यासाठी फडणवीस यांनी तज्ज्ञ मंडळी नेमली. ही मंडळी फडणवीस यांचा व्यायाम, योग्य आहार, काही पाळायची पथ्थे, ताण-तणाव, नियमित झोप, दैनंदिन जीवनशैली, आयुर्वेदिक औषधे आदी घटकांचे योग्य संतुलन साधत मुख्यमंत्र्यांनी आपले वजन कमी केले आहे.
पुढे वाचा, वजन कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काय काय केले...