आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis Travel Economy Class To Nagpur

PHOTOS: मुख्यमंत्री फडणवीसांनी विमानप्रवासात प्रवाशांसोबत काढले 'सेल्फी'...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/नागपूर- नागपूरचे सुपुत्र देवेंद्र फडणवीस रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री बनल्यानंतर प्रथमच रवाना झाले. फडणवीस यांनी विशेष विमान न घेता जेट एयरवेजच्या खासगी विमानाने जाणे पसंत केले. यावेळी विमानातून नागपूरचे अनेक प्रवासी प्रवास करीत होते. फडणवीस यांच्यासमवेत त्यांची पत्नी अमृता व मुलगी दिविजाही होती. यावेळी प्रवाशांना फडणवीस यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. विमानाच्या इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करणा-या प्रवाशांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा आनंद घेतला. फडणवीस यांनीही स्वत: सेल्फीचे फोटो क्लिक करीत आपण मुख्यमंत्री आहोत हे जाणवून दिले नाही.
मुख्यमंत्रीपदाचे प्रोटोकॉल बाजूला ठेवून आपण पण एक सामान्यच माणूस असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सिद्ध करून दाखवले. फडणवीस यांच्या या कृतीमुळे सोशल मिडियावर त्यांचे कौतुक होत आहे.
नागपूरात झाले भव्य स्वागत- सायंकाळी पाचच्या सुमारास नागपूरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होताच फडणवीस यांचे नागपूरकरांनी भव्य स्वागत केले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, नेते उपस्थित होते. फडणवीस यांनी दोन बोटे व्ही आकाराची करीत (विजयी चिन्ह) उपस्थितांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांची पत्नीसह विजयी रथयात्रा काढण्यात आली.
पुढे पाहा, फडणवीस यांची विमान प्रवासादरम्यान काढलेली व नागपूरात झालेल्या जोरदार स्वागताची छायाचित्रे....