आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Chief Minister Prithviraj Chavan On Saturday Inaugurated The Monorail In Mumbai

पहिल्याच दिवशी मोनो रेल उशिराने धावली; जाणून घ्या, जगातील सर्वात लांब मोनो रेल कुठे धावते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कायम धावपळीत राहाणा-या मुंबईकरांच्या सेवेत आजपासून मोनो रेल सुरू झाली आहे, मात्र पहिल्याच दिवशी सकाळी सात वाजता सुटणारी पहिली मोनो रेल उशीराने धावली आहे. शनिवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हिरवा झेंडा दाखवल्यांनतर मोनो रेल सुरु झाली. आज रविवार असल्यामुळे मोनोची सफर करण्यासाठी शेकडो मुंबईकरांनी रात्रीपासूनच चेंबूर स्टेशनवर गर्दी केली होती. सकाळ झाल्यानंतर गर्दी आणखी वाढली. पहिल्या मोनो रेलने पहिल्याच दिवशी वेळ चुकवली आहे. त्याचे कारण मात्र प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.
चेंबूर स्टेशनवर मध्यरात्रीपासून रांगेत उभे राहून मोनो रेलचे पहिले तिकीट मिळविण्याचा मान सुनिल खाडे यांनी मिळविला आहे. मोनो रेलची सफर करण्याबरोबरच मोनो रेल पाहण्यासाठीही अनेकांनी गर्दी केली होती. वाढत्या गर्दीचा ताण मोनो रेलवर आणि प्रशासनावर आला का, असा सवालही स्टेशनमध्ये उपस्थित नागरिक विचारीत होते. जवळपास अर्धातास उशिराने मोनोरेल धावली आहे.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, दिवसातून किती मोनो रेल धावणार