आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओला, उबेर टॅक्सीच्या मनमानीला बसेल चाप, महाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम 2017 लागू करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - फ्लीट टॅक्सी चालवणाऱ्या ओला, उबेर या ॲपवर आधारित टॅक्सीसेवांच्या भाडे आकारण्याच्या मनमानीला चाप लावण्यासाठी ॲप तसेच वेबआधारित सर्व टॅक्सीसेवांकरिता महाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम २०१७ तयार करून तो लागू करण्यात येत असल्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शनिवारी केली. अॅप आणि वेब बेस्ड टॅक्सींसाठी पिवळा व पांढरा रंग बंधनकारक करण्यात येत असल्याचेही दिवाकर रावते यांनी सांगितले. 
 
ओला, उबेरबाबत अनेक तक्रारी आल्यानंतर जनतेकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या.या सूचनांचा अभ्यास करून काही नियम तयार करण्यात आले आहेत. या सेवा पुरवणारे देशभरासाठी एकच ऑल इंडिया परमिट घेत असत.
 
आता त्यांना ऑल इंडिया परमिटवर मुंबई, औरंगाबाद, पुणे, नाशिक अशा शहरांमध्ये सेवा देता येणार नाही. त्या शहरासाठी परवाना घ्यावा लागेल आणि मुंबईतील सेवेसाठी स्वच्छ इंधन म्हणजे सीएनजी आणि पेट्रोलवरच टॅक्सी चालवणे बंधनकारक आहे. या टॅक्सींमध्ये सुरक्षेचे सर्व उपाय म्हणजे जीपीएस, पॅनिक बटन आणि कंट्रोल रूम बंधनकारक करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...