आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Cm And Deputy Cm Fir Demand For Opposition Party

'मुख्यमंत्री चव्हाण, उपमुख्यमंत्री पवारांवर गुन्हा दाखल करावा'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मंत्रालय अग्निकांडप्रकरणी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रालयात लागलेला आगीला जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणीही विरोधकांनी शुक्रवारी विधानसभेत केली.
मंत्रालय अग्निकांडप्रकऱणी अजून कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. या अग्निकांडाला राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदार आहेत. त्यांच्यामुळे पाच निष्पाप लोकांचा बळी गेला. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विरोधीपक्षांनी केली.
विरोधीपक्षांतील सदस्यांनी मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्‍यात जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रींवर गुन्हा दाखल करण्याबाबत निवेदनही दिले. यावेळी भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस आणि आमदार गिरीश महाजन उपस्थित होते.
मंत्रालय आगीची जबाबदारी सामूहिक - उपमुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मंत्रालय इमारत सुरक्षितच; केवळ डागडुजी करण्याची गरज
मंत्रालय अग्निकांडांचा सीबीआयच्या 30 अधिकार्‍यांकडून तपास सुरू