आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Cm Devendra Fadanvis Miss The Oppertunity Dinner With Barak Obama

सरकारी बाबूंच्या अनास्थेमुळे ओबामांसमवेत डिनर करण्याची फडणवीसांची संधी हुकली!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा तीन दिवसीय भारत दौरा मंगळवारी दुपारी संपला. बराक ओबामा यांच्या विमानाने दुपारी 1 वाजता दिल्लीतील पालम विमानतळावरून सौदी अरेबियाकडे उ्डडाण केले. ओबामा रविवारी सकाळी भारतात पोहचले होते. त्याच सायंकाळी ओबामांसाठी राष्ट्रपती भवनाने शाही डिनर ठेवले होते. या शाही डिनर सोहळ्याला राष्ट्रपती भवनाने केवळ खास अशा 250 लोकांना निमंत्रित केले होते. त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेले निमंत्रण राष्ट्रपती भवनाने दिल्लीतील महाराष्ट्र सदनाकडे पाठवले होते. मात्र, महाराष्ट्र सदनातल्या अधिका-यांनी हलगर्जीपणाचा कळस गाठत हे निमंत्रण मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत पोहचलेच नाही. त्यामुळे रविवारी दिल्लीतच असलेले फडणवीसांना ओबामांसोबत डिनर घेण्याची संधी असतानाही ती हुकली. राष्ट्रपती भवनाने 17 जानेवारीलाच महाराष्ट्र सदनाकडे हे निमंत्रण पाठवले होते. मात्र, ते फडणवीस यांना 25 तारखेला मिळाले. 26 तारखेला मात्र राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आयोजित केलेल्या हाय टी पार्टीला मात्र मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी बराक ओबामा व मिशेल ओबामा यांच्याशी देवेंद्र फडणवीस यांची भेट घालून देत ओळख करून दिली होती. देशातील सर्वात प्रगतीशील राज्याचा तरूण मुख्यमंत्री अशी फडणवीस यांची ओबामांना मोदींनी ओळख करून दिली होती.
महाराष्ट्र सदनातल्या अधिका-यांचा हा घोळ इथेच संपत नाही तर 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या झेंडावंदनाला सदनातील निवासी आयुक्त आणि राजशिष्टाचार आयुक्तांनी झेंडावंदनाला दांडी मारली. त्यामुळे महाराष्ट्र सदनातील अधिका-यांचा एकना एक कारनामा उघड होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रविवारी राष्ट्रपती भवनात ओबामांसाठी आयोजित केलेल्या स्नेह भोजनाचे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र महाराष्ट्र सदनातल्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत हे निमंत्रणच पोहचवलेच नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची ओबामांसमवेतची होणारी भेटही टळली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. तसेच या अधिका-यांवर कारवाई होणार करणार असल्याचे कळते आहे.