आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवेंद्र फडणवीस आणि अमृता यांचे असे जुळले होते लग्‍न; वाचा, Wedding Story

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, असे म्हटले जाते. जगात असे अनेक पुरुष  आहेत की, त्यांना 'लेडी लक' लाभले आहे. मग त्याला आपले युवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील अपवाद नाहीत.

जागतिक महिला दिनाचे औचित्य ओळखून आम्ही आपल्यासाठी महाराष्‍ट्र राज्याचे युवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांची वेडींग स्टोरी घेऊन आलो आहे.

देवेंद्र फडणवीस वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी नागपूरचे महापौर बनले होते. देशातील सर्वात तरूण महापौर म्हणूनही त्यांचा गौरव झाला होता.  मुख्यमंत्र्यांच्या यशस्वी राजकारणामागे त्यांच्या पत्नी अमृता यांचा मोठा वाटा आहे. देवेंद्र आणि अमृता यांचे लग्‍न कसे जुळले होते, याबाबत खास माहिती...

देवेंद्र म्हणाले होते, काजोलसारखी दिसते
देवेंद्र फडणवीस यांची आवडती अभिनेत्री म्हणजे काजोल. ते जेव्हा पहिल्यांदाच अमृता यांना भेटले होते तेव्हा, 'तू काजोल सारखी दिसतेस, असे म्हणतच देवेंद्र यांनी त्यांना प्रपोज केले होते.

नागपूरच्या नामवंत डॉक्टरांची कन्या
आमदार म्हणून दुसर्‍यांदा निवडून आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे लग्‍न झाले. त्यांचा विवाह हा नागपूरमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. त्यांच्या पत्नी अमृता या नागपूरचे नामवंत डॉ.चारू रानडे आणि नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. शरद रानडे यांच्या कन्या. देवेंद्रचे निकटवर्तीय आणि मित्र शैलेश जोगळेकर यांच्या घरी देवेंद्र आणि अमृता यांची भेट झाली होती, असे शैलेश सांगतात. दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. देवेंद्र आणि अमृता यांना देविजा नावाची कन्या आहे.

कॅन्सर रोग केंद्र स्थापित करण्याचे स्वप्न
गेल्या काही वर्षांपासून देवेंद्र आणि अमृता नागपूरमध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूट स्थापन करण्याचे स्वप्न बाळगून आहेत. संघ परिवाराची संस्था असलेल्या डॉ. आबाजी थत्ते या संस्थेच्या माध्यमातून वर्धा मार्गावर जामठा येथे ही योजना सत्यात उतरवण्याचा त्यांचा विचार आहे.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, अमृता यांच्‍या विषयी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...