आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीशी आघाडी तोडा, NCPची देहबोली काँग्रेसविरोधी - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विधानसभेच्या १४४ जागांसाठी राष्ट्रवादी अडून बसल्याने दोन्ही काँग्रेसमधील आघाडी तुटते की काय यावर तर्क लढवले जात असतानाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांअडून रविवारी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीला इशारा दिला. राष्ट्रवादीची देहबोली काँग्रेसविरोधी असल्याची कार्यकर्त्यांची भावना असून, आघाडी तोडावी असेच त्यांचे म्हणणे आहे, असे चव्हाण म्हणाले. तथापि, १५ वर्षांपासूनची आघाडी तोडण्याची आपली इच्छा नसल्याची मखलाशीही त्यांनी केली आहे.

वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री म्हणाले की, आघाडी तोडण्याची आमची इच्छा नाही, पण सरकारमध्ये काम करताना तसेच नविडणुकीदरम्यान राष्ट्रवादीच्या भूिमकेवर कॉँग्रेसचे तळागाळातील कार्यकर्ते समाधानी नाहीत. आमची विजयाची संधी हुकवण्यासाठी अपक्ष उमेदवार उभे करण्याची त्यांची परंपरा आहे. राष्ट्रवादीची देहबोली कॉंग्रेसविरोधी आहे, असे कार्यकर्त्यांना वाटते.

मोदींसह माझ्याही नेतृत्वाची कसोटी : विधानसभा नविडणूक माझ्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची कसोटी आहे, असे सांगून चव्हाण म्हणाले, भाजपची कामगिरी वाईट झाली तर लोकसभा नविडणुकीतील मोदींचा विजय म्हणजे योगायोग असे लोक म्हणतील.
मुख्यमंत्री आणि पक्षाची कामगिरी यांच्यात भेद करता येऊ शकत नाही. पक्षाचा विजय सर्वांचाच असतो, असे चव्हाण म्हणाले.
जनतेत माझ्याबद्दल सकारात्मक भावना असेल मतदानात प्रतिबिंब उमटेल. लोकांना मी मुख्यमंत्री म्हणून हवा असेन तर ते माझ्या उमेदवारीला पाठिंबा देतील, असे चव्हाण म्हणाले.