आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CM देवेंद्र फडणवीसांच्या मिसेस New York फॅशन वीकमध्ये रॅम्पवर करणार कॅटवॉक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस. - Divya Marathi
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस.
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता आज (गुरुवार) अमेरिकेतील मॅनहटन शहरातील ‘न्यूयार्क फॅशन वीक’मध्ये रॅम्पवर कॅटवॉक करणार आहेत. या कार्यक्रमातून त्या स्त्री शिक्षण हॅन्डलूमवरील कपड्यांचे प्रमोशन करतील. पुण्याच्या एका फॅशन डिझायनर इन्स्टिट्यूटच्या वतीने त्या शो-स्टॉपर असणार आहेत. हा सोहळा 8 सप्टेंबर रोजी मॅनहॅटन येथे होणार आहे. महाराष्ट्राच्या एखाद्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने फॅशन वीकमध्ये रॅम्पवर कॅटवॉक करण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल.

अमृता म्हणाल्या- माझे रॅम्प वॉक मॉडेलसारखे असणार नाही...
- इंग्रजी दैनिक द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, पुण्यातील चेसा इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन अँड टेक्नॉलॉजीच्या वतीने अमृता फडणवीस न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये सहभागी होणार आहेत.
- शोमध्ये त्या या इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी हँडलूमने डिझाइन केलेल्या इंडो-वेस्टर्न कॉस्ट्यूम सादर करणार आहेत.
- ज्या विद्यार्थ्यांनी हे ड्रेस डिझाइन केले आहेत ती शेतकऱ्यांची आणि मोलमजूरी करणाऱ्या कामगारांची मुले आहेत.
- यापूर्वी अमृता यांनी डिझायनर हेमंत त्रिवेदीने आदीवासी शैलीत डिझाइन केलेले ड्रेस प्रमोट केले आहेत.
- त्यांचे म्हणणे आहे, 'माझ्या पुढाकारामुळे जर यंगस्टर्स हँडलूमकडे आकर्षित झाले तर चांगलेच आहे.'
- रॅम्प वॉकबद्दल अमृता म्हणाल्या, 'माझे रॅम्पवर चालणे हे मॉ़डेलसारखे असणार नाही.'
स्त्री शिक्षणासाठी...
अमृता यांचे म्हणणे आहे, की मुलींच्या शिक्षणासाठी पालकांचे कॉन्सलिंग करणे गरजेचे आहे. मुली शिकल्या तर पुढची पिढी सुशिक्षित आणि संस्कारी राहिल.
- अमृता या नागपूरमधील सेकरी हे गाव दत्तक घेण्याच्या तयारीत आहेत. हे गाव दत्तक घेऊन त्याचा संर्वांगिन विकास करण्याचा त्यांचा मनोदय आहे.
- अमृता या बँकर आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी अमृता यांनी त्यांची बदली मुंबईत करुन घेतली आहे.
- त्यांचे म्हणणे आहे की पती देवेंद्र हे देखील त्यांचे स्वतंत्र व्यक्तीमत्व विकसित व्हावे यासाठी प्रोत्साहित करीत असतात.
पुढील स्लाइडमध्ये पाहा अमृता फडणवीस यांचे ग्लॅमरस PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...