आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदी सरकारविरोधात काँग्रेसचा मोर्चा, पोलिस व कार्यकर्त्यांत जोरदार धरपकड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसने आज राज्यभर मोर्चा काढण्याचे ठरवले आहे. मोदी सरकारने 'अच्छे दिन' आणले नसल्याचे सांगत प्रदेश काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारची पुण्यतिथी साजरी करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जाहीर केले होते.
दरम्यान, मोदी सरकारच्या कामगिरीविरोधात मुंबई काँग्रेसने मुंबईत काढलेला मोर्चा पोलिसांनी अडवला आहे. यात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह राज्यातील बडे नेते सहभागी झाले होते. गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान या दरम्यान या मोर्चा काढण्यात येत होता. मात्र, पोलिसांनी पोलिस जिमखान्याजवळ मोर्चासाठी परवानगी काढली नसल्याचे कारण सांगत अडवला आहे.
केंद्रातील मोदी सरकारची आज पहिली वर्षपूर्ती आहे. यानिमित्ताने काँग्रेसने मोदी सरकारविरोधात रान उठवण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून काँग्रेसने राज्यभर आंदोलन मोर्चा काढण्यात येत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह सर्व छोट्या-मोठ्या शहरांत व जिल्ह्या-जिल्ह्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आज मुंबईत मुंबईचे अध्यश्र संजय निरूपम यांच्या मार्गदर्शनाखाली तर अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येत होता.
मात्र, मोर्चा पोलिस जिमखान्याजवळ येताच पोलिसांनी तो अडवला. परवानगी नसल्याचे सांगत व ज्या मार्गावरून मोर्चा काढला आहे तो महामार्ग असल्याने तेथून मोर्चा काढता येणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, काँग्रेस कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले तर काहींना थेट अटक करून टाकली.
पुढे छायाचित्रात पाहा, मुंबईत काँग्रेस व पोलिसांत झालेली धरपकड.....
बातम्या आणखी आहेत...