मुख्यमंत्री म्हणाले, गुजरातमध्ये
नरेंद्र मोदी यांनी एकाधिकारशाहीने कारभार केला. त्याच एकाधिकारशाहीने ते केंद्रात कारभार करत आहेत. मोदी स्वत: ची प्रसिद्धी करण्यासाठी सार्वजनिक पैशाचा मोठा अपव्यय करत आहेत. ज्या राज्यांकडे अधिक वीज आहे, त्यांची वीज इतर राज्यांना पुरवणे केंद्राचे काम आहे. आम्ही मागणी केली. पण मोदी सरकार त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत आहे. केंद्रामुळे देशात विजेचे गंभीर संकट निर्माण झाल्याचे सांगत मोदींनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना बोलावून बैठक घेतली पाहिजे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या धोरणामुळे देश अंधारात बुडण्याचा धोका निर्माण झाल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.
-100 दिवसात काळ्या पैशातले 100 रूपये सुद्धा आणले गेले नाहीत
- पंतप्रधान कार्यालयाने मंत्र्यांचे अधिकार कमी केले
- ज्येष्ठांना हाकलून दिले व पक्षावर वर्चस्व मिळविण्याचा यशस्वी प्रयत्न केला
- देशातील ऊर्जा प्रश्न गहन बनला असून, सर्व मुख्यमंत्र्यांची तातडीने बैठक बोलावली पाहिजे
- मोदी सरकारचे 100 दिवस भ्रम करणारे
- महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊनही कमी करता ती सुरुवातीलाच वाढवली
- पंतप्रधानांकडून सर्व मंत्र्यांवर पाळत ठेवून दहशत निर्माण केली जात आहे
- एका वरिष्ठ नेत्यांच्या मुलाची बातमी फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला
- जनतेंच जीवन सुकर होईल असा एकही निर्णय मोदी सरकारने घेतला नाही
- पंतप्रधान कार्यालयात एकाधिकारशाही आहे. कोणत्याही मंत्र्याला
आपल्या विभागाचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नाही
- योजनांची नावे बदलून कॉपी-पेस्ट करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न
- निर्मल ग्राम योजना महाराष्ट्राची मोदी देशभर लागू करीत आहे. त्यांचे त्याबाबत स्वागत. कारण ही योजना चांगलीच आहे. मात्र त्याचे श्रेय थोडेफार राज्याला द्यायचा मोठेपणा दाखवायला हवा
- शिक्षकदिनी शाळांमध्ये पंतप्रधानांचे भाषण दाखविण्याची सक्ती कशाला, यातून आपण नेमका काय संदेश देत आहोत?
- देशातील सर्व व्यवस्थेला वेठीस धरून व कोट्यावधी शाळकरी लहान मुलांना सक्ती करू नये, अशी सक्ती यापूर्वीच कधीच नव्हती
- सोलापूरच्या सभेत मुख्यमंत्र्यांचा जाणूनबुझून अपमान केला.
- त्याआधी मोदी राज्यात आले असताना जे काही प्रोटोकॉल पाळावे लागतात ते पाळले
- केवळ भपकेबाज भाषणबाजी करून मते मिळवायची, मात्र विकासाचा मुद्दा पुढे न्यायचा नाही हे मोदींचे धोरण.