आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Congress Meeting Is Going On At Sonia Gandhi\'s House

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादीने 144 जागांचा हटट् न सोडल्यास काँग्रेस स्वबळावर लढेल- माणिकराव ठाकरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- राज्यातील जनतेच्या पसंतीस उतरलेल्या महायुतीतील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटपाबाबत आघाडीचे घोडे आठवड्याभरानंतर पुढे सरकले आहे. दिल्लीत काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष सोनिया गांधींच्या घरी राज्यातील आघाडीच्या जागावाटपाबाबत अंतिम बोलणी सुरु आहे. दरम्यान, राष्ट्रवादीने आठमूठी भूमिका सोडावी. 144 जागा देणे शक्य नाही असे काँग्रेसने पहिल्यापासून सांगितले आहे. राष्ट्रवादी अडून बसल्यास काँग्रेस स्वबळावर राज्यात निवडणुकीला सामोरे जाईल असे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी सागितले.
काँग्रेसने प्रथम आपल्या कोट्यातील 174 जागांवर चर्चा केली तसेच निवडणूक समितीकडून माहिती घेतली. या बैठकीला सोनिया गांधींसह अहमद पटेल, मल्लिकार्जुन खारगे, अंबिका सोनी, वीरप्पा मोईली, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश आदी नेते उपस्थित होते.
राज्यातील विरोधकांच्या घडामोडींवर काँग्रेसचे बारीक लक्ष आहे. युती तुटली अथवा नाही तुटली तरी राष्ट्रवादीशी आघाडी करायची की नाही यावर चर्चा झाल्याचे समजते. युती कायम राहिल्यास व राष्ट्रवादीशी आघाडी ठेवायची ठरल्यास पवारांच्या पक्षाला किती जागा सोडायच्या यावर खल झाला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आपल्याच कोट्यातील जागेवर सध्या लक्ष केंद्रित करावे. राष्ट्रवादीच्या कोट्यातील जागांवर नंतर चर्चा करता येईल असे सांगत आपल्याच कोट्यातील जागांवरील उमेदवार निश्चित करण्यात येत आहेत.
ही उमेदवारी यादी अंतिम करण्यापूर्वी सोनिया गांधी वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्येक जागेवरचा अहवाल मागवत आहेत व त्यानंतरच अंतिम यादी तयार होईल. त्यानंतर ही यादी मुख्यमंत्र्यांच्या हातात तपासायला दिली जाईल. सध्या तरी काँग्रेस पक्षामध्ये थंडच वातावरण असून, महायुतीच्या घडामोडीनंतरच अंतिम निर्णय घेण्याचे ठरविल्याचे दिसत आहेत. कारण राज्यातील काँग्रेस नेते व राष्ट्रवादीचे नेते कोणतेही तीव्र व तिखट प्रतिक्रिया देताना दिसत नाहीयेत. एक-दोन दिवसात निर्णय होईल असे सांगत या नेत्यांनी आठवडा काढला. राष्ट्रवादीने दोन दिवसांचे अल्टिमेटम दिल्यानंतरही अजित पवार वरिष्ठ नेते निर्णय घेतील असे सांगत आहेत, यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे युतीतील घडामोडींवर बारीक लक्ष असल्याचे सांगून जात आहे.