(फाईल फोटो: मुंबईतील कार्टर रोडवरील ओसिएनिक बिल्डिंग. याच इमारतीतील पाचव्या मजल्यावर काँग्रेसचे आमदार कृपाशंकर सिंह यांचा मुलगा नरेंद्र मोहन सिंह यांचा फ्लॅट आहे जो 1 लाख रुपये प्रति स्क्व्अेयर फुटच्या रेटने विकायला काढला आहे)
मुंबई- मुंबईतील कार्टर रोडवरील दिवंगत अभिनेता राजेश खन्नाचा 'आशीर्वाद' बंगला नुकताच 95 कोटींना विकल्याची बातमी आली होती. मात्र, या परिसरातील आणखी एक प्रॉपर्टी कमाईबाबत नवा रेकॉर्ड बनवू शकते. इंग्रजी वृत्तमानपत्र 'मिड डे'च्या दिलेल्या वृत्तानुसार, ओसिएनिक बिल्डिंगमधील 2 BHK च्या एका फ्लॅटसाठी मालकाने 1 लाख रुपये प्रति स्क्व्अेयर फुटाचा रेट मागत आहे.
काँग्रेस आमदाराच्या मुलाचा फ्लॅट, किंमत फक्त 7.4 कोटी- कार्टर रोडवरील ओसिएनिक बिल्डिंगमधील पाचव्या मजल्यावर असलेल्या या फ्लॅटची मालकी काँग्रेस आमदार कृपाशंकर सिंह यांचा मुलगा नरेंद्र मोहन सिंह यांच्याकडे आहे. नरेंद्रमोहन सिंह यांनी फ्लॅट विकण्याला दुजोरा दिला आहे. सिंह यांचा फ्लॅट 740 स्क्व्अेयर फूटाचा आहे. जर या फ्लॅटची किंमत 1 लाख रूपये स्क्व्अेयर फूटने ठरली ही प्रॉपर्टी 7 कोटी 40 लाखांची होते. कार्टर रोडवर याआधी इतका महाग फ्लॅट याआधी कधीही विकला गेला नाही. नरेंद्र यांचे म्हणणे आहे की, या अपार्टमेंटमधून समुद्राचा जबरदस्त असा नजारा दिसतो.
एवढी किंमत मिळणे अवघड- नरेंद्रमोहन सिंह हे जरी एक लाख रुपये प्रति स्क्व्अेयर फुटच्या रेटने हा फ्लॅट विकू पाहत असतील पण ही किंमत मिळणे अवघड आहे असे या भागातील ब्रोकर्सचे म्हणणे आहे. सिंह जी किंमत सांगत आहेत ती खूपच आहे. या भागात सध्या 70-80 हजार प्रति स्क्व्अेयर फूट असा दर चालला आहे. सिंह यांचा फ्लॅट ज्या बिल्डिंगमध्ये आहे ती खूपच जुनी आहे व तेथील फ्लॅटही छोटे आहेत. कार्टर रोडवरील नवीन फ्लॅटच्या तुलनेत हा फ्लॅट उत्तम आहे असे म्हणता येणार नाही. सी फेसिंग (ज्या फ्लॅट्समधून समुद्राचा नजारा दिसतो) फ्लॅट्सला मागणी असली तरी 1 लाख रूपये प्रति स्क्व्अेयर फूटाचा भाव मिळणे अवघड आहे. जर असे झाले तरी या भागातील सर्वात महाग विकली गेलेली ही प्रॉपर्टी ठरू शकते.
वांद्र्यात 97 हजार प्रति स्क्व्अेयर फुट रेटने विकला होता फ्लॅट- मुंबईतील वांद्रा परिसर सर्वात महागडा समजला जातो. या भागात नुकताच एक फ्लॅट 97 हजार प्रति स्क्व्अेयर फुटाच्या हिशोबाने विकला आहे. बांधकाम क्षेत्रातील गौतम आहूजा यांनी पेरी क्रॉस रोडवर सूना विलामध्ये हा फ्लॅट खरेदी केला होता.
पुढे पाहा, आमदारपुत्र नरेंद्रमोहन सिंह यांच्या बंगल्याची छायाचित्रे...