आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Congress News In Maharashtra, Divyamarathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदी, आपचा धसका; राज्यातील कामगिरीबाबत काँग्रेस नेत्यांना चिंता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- निवडणूकपूर्व अंदाजांनुसार लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा फज्जा उडणार, असे संकेत मिळाले आहेत. कदाचित त्यामुळे काँग्रेसमध्येही भीती पसरली आहे. राज्यातील जागा राखणे काँग्रेसला कठीण जाणार असल्याचा मुद्दा शनिवारी झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत उपस्थित झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश हे काँग्रेसच्या विविध नेत्यांबरोबर चर्चा करत आहेत. या बैठकांमधून लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरवली जात आहे. गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने 26 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 17 जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. या 17 पैकी पाच जागा मुंबईतील होत्या. मात्र, या जागा वाचवण्यासाठी अधिकाधिक लोकहिताचे निर्णय घ्यावे लागणार असल्याचे मत काँग्रेस नेत्यांनी बैठकीत मांडले.

मुंबईत सुमारे 70 लाख झोपडपट्टीधारक आहेत. त्यामुळे 2000 पर्यंतच्या झोपडपट्टय़ा अधिकृत करण्याचे आश्वासन पूर्ण करावे लागणार असल्याचे मत या नेत्यांनी व्यक्त केले. मोनो रेल सुरू झाल्याने आणि मेट्रोही लवकरच सुरू होणार असल्याने मध्यमवर्गीय मतांबाबत मात्र सकारात्मक चर्चा झाली. मुंबईत अन्न सुरक्षेचा लाभ मिळण्यासाठी उत्पन्न र्मयादा 60 हजार ठरवण्यात आली आहे. या निर्णयाचाही काँग्रेसला तोटा होणार असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी मांडल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोदी, आपचा धसका
आप आणि नरेंद्र मोदींच्या वाढत्या प्रभावाबाबतही बैठकीत चर्चा झाली. 2009 मध्ये ज्या जागांवर काँग्रेसचा पराभव झाला त्या ठिकाणी गुणवत्तेच्या आधारे उमेदवार निवडला जाणार असल्याचेही या बैठकीत ठरले.