आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Democratic Alliance Mean Particition In Ally Nawab Malik

महाराष्ट्र डेमेक्रेटिक अलायन्स म्हणजे युतीत फूट - नवाब मलिक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी मांडलेली महाराष्ट्र डेमेक्रेटिक अलायन्सची (एमडीए) संकल्पना म्हणजे भाजप आणि शिवसेना यांच्या युतीमध्ये काही तडा तर गेला नाही ना, अशी शंका उपस्थित करते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरुवारी लगावला.
शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या कर्नाटकमधील पराभवाने आनंद झाल्याचे सांगितले असल्याने या ‘एमडीए’मध्ये नक्की कोणते पक्ष असणार हे स्पष्ट झालेले नसल्याचे मलिक म्हणाले. भाजप आणि शिवसेना यांनी 25 वर्षांपूर्वी एकत्र येऊन युती स्थापन केली. त्यामध्ये रिपाइंला घेऊन त्यांनी महायुतीची घोषणा केली, पण भाजपच्या काही नेत्यांना आता मनसेने आपल्यामध्ये यावे, असे वाटत आहे. त्यामुळे ‘एमडीए’ची घोषणा केली जात असल्याचे ते म्हणाले.


मनसेला जवळ करण्यासाठीच पर्याय : मनसेला युतीत येण्यास शिवसेनेचा विरोध आहे. त्यामुळे भाजपकडून एमडीएच्या माध्यमातून मनसेला जवळ करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शिवसेनेच्या ताकदीबद्दल शंका असल्यानेच भाजप हा प्रयोग करत असल्याचेही बोलले जाते.