आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Democratic Alliance News In Marathi, Prakash Ambedkar

महाराष्‍ट्र लोकशाही आघाडीचे 16 उमेदवार जाहीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्‍ट्र लोकशाही आघाडीच्या (एमडीएफ) 16 उमेदवारांची दुसरी यादी शुक्रवारी प्रसिद्ध झाली. यामुळे आघाडीच्या राज्यातील एकूण उमेदवारांची संख्या आता 29 झाली आहे. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बहुजन महासंघाच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या या आघाडीत 23 पक्ष आणि संघटनांचा समावेश आहे. राज्यातील 48 पैकी 47 जागा ही आघाडी लढवत आहे. अमरावती मतदारसंघात ‘एमडीएफ’ने ‘रिपाइं’चे राजेंद्र गवई यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे.


दुसरी यादी : बीड-कृष्णा काळे, परभणी-शेख बाबामियाँ कासीम, मावळ-उत्तम शिंदे, यवतमाळ- मोहन राठोड, नांदेड-मनीषा पवार, दिंडोरी-मच्छिंद्र मोरे, वर्धा-हरिभाऊ साठे, उस्मानाबाद-मिलिंद रोकडे, हिंगोली-रामराव वाटेगावकर, कोल्हापूर-अतुल दिघे, औरंगाबाद- वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया, मालेगाव-वेल्फेअर पार्टी, दक्षिण मुंबई-शहजाद पठाण, दक्षिण मध्य मुंबई-मिलिंद रानडे, ईशान्य मुंबई-प्रा. अविनाश डोळस, उत्तर पश्चिम मुंबई-गंगाधर मुळे.