आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Development During NCP Congress Government

PICS : कॉँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात असे बदलले महाराष्ट्राचे चित्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(देशातील पहिला फोर लेन डबल डेकर फ्लायओव्हर)
मुंबई - महाराष्ट्रात मागील 15 वर्षांपासून आघाडी सरकारचे राज्य होते. या काळात अनेक मुख्यमंत्री आले आणि गेले. तर अनेक भष्ट्राचाराची प्रकरणे बाहेर काढण्याबरोबरच काही विकास कामेदेखील करण्यात आली. काही दिवसांपूर्वीची या दोन्ही पक्षांमधील मौत्री तुटली असून महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ता मिळावी यासाठी हे दोन्ही पक्ष प्रयत्नशिल असल्याचे चित्र आहे. हातातून सत्ता निघून जावू नये यासाठी दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेते मंडळी प्रचारादरम्यान विकस करण्याचे आवाहन देत आहे. आज आम्ही तुम्हाला मागील 15 वर्षांमध्ये महाराष्ट्रात आघाडी सरकारद्वारा करण्यात आलेल्या विकास कामांबद्दल सांगणार आहोत. महाराष्ट्रात करण्यात आलेल्या या विकास कामांमध्ये वेळोवेळी केंद्रसरकारनेही मदत केली आहे.
देशातील पहिला फोर लेन डबल डेकर फ्लायओव्हर

मुंबईत देशातील पहिला फोर लेन डबल डेकर फ्लायओव्हर आघाडी सरकारच्या काळात बनवण्यात आला. या फ्लायओव्हरवर असलेले रस्ते दोन लेव्हलवर एकमेकांना क्रॉस करण्यात येतात. या ओव्हरब्रिजमुळे ईस्टर्न आणि वेस्टर्न हायवे एकमेकांना जोडले गेले आहेत. या बिजची एकून लांबी 6.5 किलोमीटर इतकी आहे.

या नवीन तयार करण्यात आलेल्या लिंक रोडमुळे सायन, धारावी, टी जक्शंन आणि कलानगर जंक्शन या ठिकाणांवर होणारी वाहतुकीच्या कोंडी सोडवण्यात यश आले आहे. सुरुवातीला या प्रोजेक्टचा एकूण खर्च 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक होता परंतु, 11 वर्षांपर्यंत याचे काम करण्यात न आल्याने हा प्रोजेक्ट पूर्ण न झाल्याने यासाठी 450 कोटी रुपये इतका खर्च झाला.

पुढील स्लाइडवर पाहा,आघाडी सरकारद्वारे करण्यात आलेली विकास कामे...