आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध, मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या वेळी त्यांनी मुंबईतील हुतात्मा चौकातील स्मारकाला पुष्पचक्र अर्पण केले. संयुक्त महाराष्ट्रातील चळवळीतल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र दिन हा आपल्या मराठी जनतेसाठी महत्त्वाचा दिवस आहे. महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या आणि राज्याच्या हितासाठी हौतात्म्य पत्करलेल्या नेत्यांना आठवून या महाराष्ट्राला अधिक मजबूत करण्याच्या इराद्याने आम्ही काम करत आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विकास आराखडे, शेती, पाण्याचे नियोजन करून राज्य सकारात्मकतेने पुढे जात आहे. शासनाने निर्णयक्षमता दाखवली आहे, असेही त्यांनी सांगितले. यासोबतच कामगार दिनानिमित्त सर्व कामगारांनाही शुभेच्छा दिल्या.

नागरिकांनीही द्यावे विकासपर्वात सहकार्य
आमच्यासरकारकडून राज्यातील जनतेच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारे निर्णय घेतले गेले आहेत, या निर्णयांमुळे राज्यात विकासाचे नवे पर्व सुरू होत आहे. त्यासाठी नागरिकांनीही आपला सहयोग द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातील नागरिकांना दिलेल्या शुभेच्छापर संदेशात त्यांनी हे आवाहन केले आहे.