आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टंचाईग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील टंचाईग्रस्त गावांमधल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाचा फायदा राज्यातील दहा हजार पाचशे आठ गावातल्या विद्यार्थ्यांना होणार आहे.

2013 -14 या वर्षाच्या खरीप हंगामात ज्या गावाची पैसेवारी ही 50 टक्क्यांपेक्षा कमी आहे अशी 10 हजार 508 गावे महसूल आणि वन विभागाने टंचाईग्रस्त जाहीर केली होती. सरलेल्या आर्थिक वर्षात पाठोपाठ आलेल्या नैसर्गिक आपत्तींमध्ये शेतकर्‍यांना जास्तीत जास्त मदत मिळावी या उद्देशाने सरकारने काही चांगले निर्णय घेण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यानुसार टंचाईग्रस्त गावातल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नुकताच घेतला आहे. या निर्णयासंदर्भातल्या तत्काळ कार्यवाहीचे आदेश या विभागातर्फे देण्यात आले असून उच्च शिक्षण संचालकांना याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे.