आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Former Home Minister R. R Patil Funeral

मुलाचा चेहरा पाहून आईने फोडला टाहो, दिग्गज नेत्यांनाही अश्रू अनावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आर.आर. पाटील यांचे सोमवारी मुंबईतील लिलावती हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज (मंगळवार) त्यांचे मुळ गाव अंजनीमध्ये अंत्यसंस्कार होणार आहे. काही दिवसांपासून आबा कँसरने पीडित होते. सोमवारी त्यांच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर त्यांची आई भागीरथीबाई यांना अश्रू अनावर झाले. पाटील यांचे पार्थिव तासगावला नेण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयात ठेवण्यात आले होते. येथे त्यांच्या कुटुंबियांसह अनेक दिग्गज नेते आणि प्रतिष्ठीतांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी मुलाचे पार्थिव पाहिल्यानंतर या माऊलीने अश्रूंना वाटे मोकळी करुन दिली.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, दिग्गज नेत्यांपासून पोलिसांनी वाहिली आबांना श्रद्धांजली