आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता पासपोर्ट मिळेल २१ दिवसांत, पाेलिसांचे उंबरठे झिजवण्याचे कष्ट वाचणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पोलिसांकडून देण्यात येणाऱ्या परवानग्या, ना हरकत प्रमाणपत्रे तीन ते २१ दिवसांत देण्याचे बंधन घालणारा अध्यादेश शासनाने काढल्यामुळे लोकांची मोठी सोय होणार आहे. कोणत्या सेवा किती दिवसांत पुरवायच्या याबाबतचा तपशीलही जारी करण्यात आला आहे. पासपोर्टच्या कागदपत्रांवर २१ दिवसांत निर्णयाचे बंधन आहे.
गृह विभागाचे प्रधान सचिव बी. के. उपाध्याय यांच्या स्वाक्षरीने ही अधिसूचना जारी झाली असून यात पोलिसांशी संबंधित १७ सेवांचा समावेश आहे. निर्धारित वेळेत या सेवा पुरवल्या गेल्या नाहीत तर कुठे दाद मागायची, याचाही तपशील त्यात आहे. प्रथम खबरी अहवाल (एफआयआर) नोंदणी होताच तत्काळ पुरवण्याचे बंधन आहे. यासह इतर प्रमाणपत्रांसाठीचे बंधन विशेष शाखेच्या पोलिस निरीक्षकावर टाकण्यात आले आहे. मुदतीत त्यांनी निर्णय न घेतल्यास वा त्यांनी अर्ज फेटाळल्यास विशेष शाखेचे सहायक पोलिस आयुक्त वा उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे दाद मागण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. या अधिकाऱ्यांकडेही न्याय न मिळाल्यास पोलिस अधीक्षकांकडे वा विशेष शाखेच्या पोलिस उपायुक्तांकडे दाद मागता येईल.
निमशासकीय खासगी संस्था यामध्ये नोकरीसाठी वर्तणूक व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देण्याच्या अर्जावर कार्यालयीन कामकाजाच्या ३० दिवसांत पोलिस निरीक्षकांना निर्णय घ्यावा लागेल.
बातम्या आणखी आहेत...