आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Governer C Vidyasagar Rao Speech In Vidhansabha

\'राज्यपाल परत जा\' सभागृहात घोषणाबाजी, प्रचंड गदारोळात राज्यपालांचे अभिभाषण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( फोटो: महाराष्ट्राचे राज्यपाल सी.विद्यासागर राव अभ‍िभाषण करताना)

मुंबई- राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सभागृहात प्रचंड गदारोळात अभ‍िभाषण केले. अभिभाषण सुरु असताना विरोधी पक्ष शिवसेनेच्या आमदारांनी 'राज्यपाल परत जा'च्या घोषणाबाजी केली. तर कॉंग्रेसच्या आमदारांनी सभात्याग केला. विरोधकांच्या घोषणाबाजीकडे दूर्लक्ष करत राज्यपालांनी आपल्या भाषणातून नव्या सरकारचा अजेंडा मांडला. यापूर्वी विधिमंडळाच्या आवारात शिवसेनेच्या आमदारांनी राज्यपालांची गाडी अडवली. तर कॉंग्रेस आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यावर ठिय्या आंदोलन केले.

राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी नव्या सरकारकडून विधायक अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. जनमताने भाजपला कौल दिला आहे. नवीन सरकार लोककेंद्रीत प्रशासनासाठी बांधील राहिल, असे राज्यपालांनी म्हटले आहे. तसेच राज्याच्या विकासाला प्राधान्य देण्यात देणार आहे. राज्यातील रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्‍यावर नव्या सरकारचा भर असेल. तसेच अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणार आहे. याशिवाय जनता आणि सरकारमध्ये पारदर्शकत राहावी, यासाठी 'आपले सरकार' नवीन वेबपोर्टल सुरू करण्यात येणार असल्याचे राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राज्यपालांनी आपल्या अभिभाषणाला मराठी भाषेतून सुरुवात केली. सुरुवातीला राज्यपालांनी नव्या सरकारचे अभिनंदन केले. तसेच विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विरोधीपक्ष नेते एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले.

राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या अभिभाषणातील ठळक मुद्दे...

नवीन सरकारचे अभिनंदन
विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांचे तसेच विरोधीपक्ष नेते एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन
'आपले सरकार' नवीन वेब पोर्टल तसेच मोबाईल ऐप्स लवकरच लॉन्च करणार
अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार
नवे रोजगार निर्मितीवर भर देणार
देशातील जनतेला 24 तास वीज पाण्यासाठी कटिबद्ध
सरकारसमोर जनतेच्या सुरक्षेसारखे अनेक प्रश्न
राज्यातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्‍यासाठी सरकार कटिबद्ध
अनावश्यक खर्च टाळण्यासाठी सरकारचे प्रयत्न करेल
प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा ठरवून घ्यावी
नवी पर्यायी व्यवस्था आणल्यानंतर एलबीटी रद्द करणार
राज्याच्या विकासाला सर्वाधिक प्राधान्य देणार
इंदूमिलमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृतिस्थळ उभारणार
गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी नव्या योजना बनवणार
ऊस तोडणी कामगारांच्या हितासाठी विशेष प्रयत्न
एक खिडकी योजनेसाठी प्रयत्न करण्यासाठी अधिक प्रयत्न करणार
महिलांच्या संरक्षणासाठी विशेष 'वुमन सेल'
सिंचनाचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करणार
पिकांसाठी विशेष योजना राबवणार
पोलिस दल पुर्नंबांधणीसाठी प्रयत्न
वनविकासासाठी पडीक जमिनीचा वापर करणार
धान्य साठवण्यासाठी अधिकाधिक गोदामांची योजना
प्रलंबित खटल्यांचा निपटारा लवकरच
ग्रामीण भागातल्या स्वच्छतेसाठी विशेष प्रयत्न
नाशिक येथे होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देणार
वन्यजीव पर्यटनाला प्रोत्साहन देणार
वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी विशेष प्रयत्न
नद्यांमधलं प्रदूषण कमी करण्यासाठी कटीबद्ध
मुंबई-गोवा चौपदरी मार्गाचे काम लवकर पूर्ण करणार
राष्ट्रीय महामार्गांचा विकास करणार
येत्या पाच वर्षात राज्यात स्मार्ट सिटी उभारणार
अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांसाठी लक्ष देणार
राज्यातील नद्यांचा विकास करणार
'राज्यपाल परत जा'च्या सभागृहात घोषणा
राज्यातील पोलिसांसाठी सुविधा
तापीखोर्‍याच्या पुनर्भरणासाठी संशोधन
राज्याच्या जलसंधारण कामाना प्रोत्साहन देणार
ठिबक सिंजन योजनेला प्राधान्य देणार
ऊर्जा निर्मित्तीसाठी प्रयत्न करणार
मुंबईतील रखडलेले रस्त्याचे काम आणि प्रकल्प पूर्ण करणार
सोपे कायदे करण्याचा प्रयत्न करणार
लोकोपयोगी प्रशासनावर भर
कृषी आणि अन्न प्रक्रियेसाठी विशेष योजना
राज्यातल्या गुंतवणुकीसाठी विशेष प्रयत्न करणार
थेट शेतकरी आणि ग्राहक व्यवहारासाठी प्रयत्न
सार्वजनिक पुरवठ्याची व्यवस्था पारदर्शक करणार
अन्नधान्या उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणार
- ग्रामीण भागातल्या उत्पादन वाढीसाठी प्रयत्न
तत्पुर्वी, विधानसभेत मतविभाजन टाळून फक्त आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले. त्यानंतर शिवसेना आणि कॉंग्रेस आमदारांनी सभागृहात प्रचंड गोंधळ घातला. त्यापूर्वी भाजपचे ज्येष्ठ आमदार हरिभाऊ बागडे यांची बिनविरोध निवड झाली. आवाजी मतदानाने सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्या नावाचे विरोधीपक्षनेतेपदी घोषणा करण्यात आली.