आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 महिन्यात 5 हजार कोटी मिळवणार; जागतिक बँकेकडे मागितले कर्ज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्याचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना समर्पित करून २५ हजार कोटींची भरीव तरतूद करणाऱ्या राज्य सरकारने आता दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी जागतिक बँकेकडेही ५ हजार कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले, राज्यात दुष्काळाने शेतकरी त्रस्त आहे.

केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. आणखी निधीची आवश्यकता असल्याने जागतिक बँकेकडे ५ हजार कोटींच्या कर्जाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. तसा प्रस्ताव परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडेही पाठवला आहे. यातून मराठवाड्यातील ३ हजार आणि विदर्भातील २ हजार गावांना दुष्काळमुक्त करण्यात येणार आहे. यासाठी जलसंवर्धानावर भर देण्यात येईल. या भागातील पीकपद्धती बदलण्याचाही विचार आहे. या उपाययोजनांमुळे औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद व विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आयुष्य बदलेल. हा निधी ५ महिन्यात मिळावा असा प्रयत्न असेल.