आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Government Approves Rs. 100 Crore For Shirdi Airport For Remaining Work

शिर्डी विमानतळासाठी राज्य सरकारकडून आणखी 100 कोटी, वर्षभरात काम पूर्ण होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- देशातील प्रमुख धार्मिक व पर्यटनस्थळ म्हणून पुढे येत असलेल्या शिर्डी येथे लवकराच लवकर विमानतळाचे उर्वरित काम मार्गी लागावे यासाठी राज्य सरकारने आणखी 100 कोटी रूपये देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षीपासून (2017-18) शिर्डीत 'श्री साई शताब्दी' वर्ष सुरु होत असून त्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येणार आहेत. त्यामुळे 'श्री साई शताब्दी' वर्ष सुरु होण्यापूर्वी शिर्डी विमानतळ सुरु होणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे फडणवीस सरकारने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे शिर्डीकर व शिर्डी देवस्थान समितीने समाधान व्यक्त केले आहे.
देश-विदेशातील भक्तांची शिर्डीत वर्दळ वाढत चालली आहे. अनेक उद्योगपती, सेलिब्रेटीजसह राजकीय नेतेही शिर्डीतील साईंचे मोठे भक्त आहेत. त्यामुळे येथे विमानतळाची गरज होती. वाढते भक्त, पर्यटक व त्यामुळे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्धीस येत शिर्डीत विमानतळ कार्यान्वित करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच घेतला आहे. शिर्डीजवळील काकडी (ता. कोपरगाव) येथे विमानतळासाठी जागा निश्चित करण्यात आल्यानंतर त्याचे काम सुरु झाले आहे. याचा विकास खासगी सहभागातून असून, आता हे काम सुरु आहे. मात्र, कामाला अपेक्षित गती नसल्याने विमानतळाची उर्वरित विकास कामे खासगी सहभागाऐवजी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी उर्वरित कामांसाठी 100 कोटी रुपये सरकारकडून देण्यात येणार आहेत.
शिर्डी विमानतळासाठी एकून 364 कोटी खर्च-
2008 मध्ये तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमार्फत शिर्डी शहरापासून सुमारे 15 किमी अंतरावर असलेल्या काकडी येथे विमानतळाची उभारणी करण्यात येत आहे. विमानतळासाठी आजपर्यंत 372 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. राज्य शासन आणि श्री साईबाबा संस्थान यांच्यामार्फत आजपर्यंत देण्यात आलेल्या सुमारे 220 कोटींच्या निधीमधून सुमारे 200 कोटी रुपयांचा खर्च कंपनीने केला आहे. उर्वरित 20 कोटी रुपये सध्या सुरू असलेल्या कामांवर खर्च होणार आहेत. त्यासाठी एकूण 264 कोटी रुपयांच्या प्रकल्प खर्चास मान्यता देण्यात आली आहे. तसेच इतर उर्वरित कामांसाठी 100 कोटी एवढ्या अतिरिक्त निधीची तरतूद करून विमानतळासाठी 364 कोटी एवढ्या खर्चास सुधारित प्रशासकीय व वित्तिय मान्यता देण्यात आली आहे.
पुढे आणखी वाचा, भविष्याची गरज लक्षात घेऊन विमानतळाची क्षमता वाढणार...