आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Government Buy Ambedkar's Landon Based Home

आंबेडकरांचे लंडनस्थित घर सरकार विकत घेणार, जयंतीदिनी खुले करण्याची घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनमध्ये वास्तव्य केलेले ऐतिहासिक घर महाराष्ट्र सरकार विकत घेणार आहे. येत्या १४ एप्रिलला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी ही तीनमजली वास्तू स्मारक म्हणून जनतेसाठी खुली केली जाणार आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लंडनमध्ये या प्रक्रियेशी संबंधित लोकांच्या भेटीनंतर ही माहिती दिली.

याबाबत विविध संघटना आणि बुद्धिस्ट फोरमच्या संतोष दास पाठपुरावा करत होत्या. भारत सरकारकडून याबाबत काहीच हालचाली होत नसल्याने हा ऐतिहासिक ठेवा त्रयस्थाच्या मालकीचा होण्याची शक्यता होती. दरम्यान, विनोद तावडे ब्रिटनच्या शासकीय दौ-यावर असताना त्यांनी यासंदर्भात दास यांच्याशी संपर्क साधला. हा अमूल्य ठेवा ३५ कोटींत विकला जात असल्याची माहिती मिळताच तावडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दावोस येथे संपर्क करून चर्चा केली. चर्चेअंती सरकारने हे घर विकत घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती तावडे यांनी दिली. घर खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने कायदेशीर बाबी व परराष्ट्र खरेदीचे नियम पूर्ण करून २ महिन्यांत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.

लंडनमध्ये भेटीगाठी
लंडनमधील इंडिया हाऊसमध्ये ब्रिटिश उच्चायुक्त रंजन मथाई, बुद्धिस्ट फोरमच्या संतोष दास आणि तेथील उच्च अधिकारी यांची एक संयुक्त बैठक शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतली. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर भारतीय उच्चायुक्तांसह त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील त्या निवासस्थानाला भेटही दिली.

पुढे वाचा घराचे महत्त्व...