आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Government Decision Of Tobacco Liberation

आबांच्‍या निधनानंतर शाळा-कॉलेजांत तंबाखूमुक्तीची घंटा, शिक्षकांवर थेट कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांचे निधन महाराष्ट्राला चटका लावून जाणारे असून त्याला तंबाखूचे अतिसेवन कारणीभूत ठरले आहे. म्हणूनच राज्य सरकारने आता तंबाखूविरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्धार केला आहे. या मोहिमेत आरोग्य खाते शाळा तसेच अन्य शैक्षणिक संस्थांवर करडी नजर ठेवणार आहे. राज्यात एकही शिक्षक तंबाखूचे सेवन करणारा असू नये, शाळेच्या आवारात वा वर्गात त्याने तंबाखूचा बार भरून जाऊ नये, यासाठी दक्षता घेतली जात असून अशा शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
‘तंबाखूमुक्त महाराष्ट्रा’साठी तंबाखू, पानमसाला, गुटख्याच्या उच्चाटनासाठी 10 कलमी कार्यक्रम राबवण्याचा आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी बुधवारी ही घोषणा केली. सार्वजनिक ठिकाणी तंबाखूचे सेवन करण्यास आधीच बंदी आहे. या बंदीची राज्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी विशेष समिती नेमण्यात येणार आहे. तंबाखू तसेच तंबाखूजन्य उत्पादनांवरील करांमध्ये वाढ करण्यासाठीही आपण आग्रही असणार आहोत. धुम्रपान विरोधी जाहिरातींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू आहे. आता तंबाखूविरोधातही त्याच पद्धतीने जनजागृती अभियान हाती घेतले जाणार आहे. प्रभावी जाहिराती त्यासाठी बनवल्या जाणार आहेत, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.
चोरट्या गुटखा विक्रीवर बंदी
तंबाखूच्यादुष्परिणामांबाबत शालेय तसेच काॅलेजच्या विद्यार्थ्यांमध्येही जागृती केली जाणार आहे. मुले तसेच तरूण जागृत झाल्यास या अभियानाला खऱ्या अर्थाने गती मिळेल. शहरांमधील मुलांच्या तुलनेत ग्रामीण भागांमध्ये तंबाखू आणि तत्सम गोष्टी खाण्याचे प्रमाण खूपच जास्त आहे. तंबाखू किंवा चोरून गुटखा खाऊन ही मुले दिवसभर उपाशी राहतात. आदिवासी पाड्यांमध्ये तर गुटखा खाणाऱ्यांचे प्रमाण खूपच आहे. गुटख्यावर बंदी असली तरी काळ्या बाजारात गुटखा कुठे मिळतो, याची माहिती अचूक असते. याला आळा घालण्यात येणार आहे.


चोरट्या गुटखा विक्रीला आळा : तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत शालेय तसेच काॅलेजच्या विद्यार्थ्यांमध्येही जागृती केली जाणार आहे. मुले तसेच तरूण जागृत झाल्यास या अभियानाला खऱ्या अर्थाने गती मिळेल. शहरांमधील मुलांच्या तुलनेत ग्रामीण भागांमध्ये तंबाखू आणि तत्सम गोष्टी खाण्याचे प्रमाण खूपच जास्त आहे. तंबाखू िकंवा चोरून गुटखा खाऊन ही मुले िदवसभर उपाशी राहतात. आदिवासी पाड्यांमध्ये तर गुटखा खाणाऱ्यांचे प्रमाण खूपच आहे. गुटख्यावर बंदी असली तरी काळ्या बाजारात गुटखा कुठे िमळतो, याची माहिती अचूक असते. याला आळा घालण्यात येणार आहे.

समुपदेशन केंद्रे उभारणार
राज्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केद्रात तोंडाच्या कॅन्सरचे निदान तसेच स्क्रिनिंग करण्याची सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देशही आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. अनेकांना तंबाखूचे व्यसन सोडायचे असते, मात्र त्यांना योग्य ते समुपदेशन मिळत नाही. त्यासाठी विशेष समुपदेशन केंद्रे उभारण्याचीही सरकारची योजना आहे.
8 हजार डाॅक्टरांची मदत
इंडियन डेंटल असोसिएशनच्या 8 हजार डॉक्टरांनी या मोहिमेत योगदान देण्याची तयारी दर्शविली आहे. तोंडाच्या आरोग्याबाबत जागृती नसल्याने तंबाखू, गुटखा खाण्याचे प्रमाण वाढले. ही जागृती करण्याची आमची तयारी असल्याचे असोिसएशनने म्हटले आहे.
... ही धोक्याची घंटा
‘तोंडाच्या कॅन्सरमुळे राज्याला एका ज्येष्ठ, अनुभवी नेत्याला मुकावे लागले, ही दु:खद बाब आहे. राज्यात सध्या २ कोटी लोक तंबाखूच्या विळख्यात आहेत. त्यांच्यासाठी आबांचा मृत्यू धोक्याची घंटा मानली गेली पाहिजे. या घटनेतून धडा घेऊन 'तंबाखूमुक्त महाराष्ट्रा'चा विडा उचलला आहे.
- डॉ. दीपक सावंत, आरोग्यमंत्री