आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षण सुनावणी लवकर घ्या, सरकार न्यायालयाला करणार विनंती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मराठा आरक्षणासंबंधी उच्च लवकर सुनावणी घ्यावी, अशी विनंती न्यायालयाला करण्यात येणार आहे. त्याबाबत राज्य सरकार ३० सप्टेंबरला न्यायालयात बाजू मांडणार आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजात सरकारविरुद्ध असलेला रोष कमी करण्याच्या दृष्टीने सरकारने हे पाऊल उचलले असल्याची माहिती सूत्रांनी िदली.
मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात बैठक घेतली. बैठकीला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे व ज्येष्ठ सरकारी वकील उपस्थित होते. या बैठकीत न्यायालयास विनंतीचा निर्णय झाला.

मराठा आरक्षण मागणीसाठी राज्यात मराठा समाजाचे लाखोंचे मूकमोर्चे निघत आहेत. एकीकडे या मोर्चांतील संख्या वाढत चालली असताना राज्य सरकार मात्र आश्वासनापलीकडे काही करताना दिसत नाही, अशी भावना िनर्माण होत आहे. शिवाय मराठा समाजात सरकारविरुद्ध रोष आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी बैठक घेऊन न्यायालयात बाजू मांडण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. विशेषत: यांसबंधी लवकर सुनावणी व्हावी, अशी विनंती केली जाणार आहे.
विरोधकांच्या टीकेवर उपायासाठी...
सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात विचार करून निर्णय घेण्यासाठी मंत्रिगटाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. हा वेळकाढूपणा असल्याची टीका विरोधकांनी केली. यावर काही तरी ठोस पाऊल उचलले पाहिजे, अशी मराठा समाजाची भावना होती. याचदरम्यान, मुख्यमंत्री बदलासंदर्भात वावड्याही उठल्या. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी ही तातडीची बैठक घेतली.
ज्येष्ठ वकिलांच्या सूचनेनुसार निर्णय
बैठकीत सरकारच्या ज्येष्ठ व अनुभवी वकिलांनी मराठा आरक्षणाची सुनावणी उच्च न्यायालयाने लवकर घ्यावी, अशी विनंती न्यायालयाकडे करा आणि राणे समितीच्या अहवालातील काही शिफारशींवर न्यायालयाने हरकती घेतल्या होत्या. त्यातून मार्ग काढा अशा सूचनाही सरकारला केल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी िदली.
बातम्या आणखी आहेत...