आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Government 's Cabinet Decision To Buy House In London Where Dr Babasaheb Ambedkar Stayed

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाबासाहेबांच्या लंडनमधील 'त्या' घराचे स्मारक उभारणार- राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काही काळ वास्तव्य केलेले लंडन येथील घर राज्य शासनातर्फे खरेदी करून ते आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्याचा महत्त्वाचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
डॉ. आंबेडकर यांनी 1921-22 या कालावधीत लंडन येथील 10 किंग्ज हेन्री रोड, एनडब्ल्यू 3 या घरात वास्तव्य केले होते. या कालावधीत त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेतून डीएस्ससी इन इकॉनॉमिक्स आणि ग्रेझ इन या संस्थेतून बार ॲट लॉ या पदव्या संपादित केल्या. तसेच या वास्तव्यादरम्यान त्यांनी विविध विषयांवर महत्त्वपूर्ण संशोधनही केले होते. डॉ. आंबेडकरांसारख्या महापुरूषाच्या ऐतिहासिक वास्तव्याच्या आठवणी या घराशी जुळल्या आहेत. त्यामुळे ही वास्तू देशासाठी महत्त्वपूर्ण आहे. या ऐतिहासिक वैशिष्ट्यांमुळे हे घर राज्य शासन खरेदी करणार आहे.
घर खरेदीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीही स्थापन करण्यात आली आहे. या समितीत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव हे सदस्य आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. खरेदीची ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सुचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.
याशिवाय राज्य मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीत आणखी तीन निर्णय घेतले आहेत. वाचा पुढे, कोणते ते 3 निर्णय...