आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Government Sanction Nagpur Metro Project

नागपूर मेट्रोला राज्य मंत्रिमंडळाचा हिरवा कंदिल, निवडणूकीच्या तोंडावर निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नागपूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उपराजधानीचे शहर असलेले नागपूर आता मेट्रोचे शहर म्हणून ओळखले जाणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य शासनाने नागपूर मेट्रोला हिरवा कंदिल दिला आहे. केंद्र शासनाने फेब्रुवारी 2013 मध्ये नागपूर मेट्रोचा प्रस्ताव मंजूर केला होता.
आगामी लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर विदर्भातील मतदारांना डोळ्यासमोर ठेवून राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
कसा असेल मेट्रोचा मार्ग
नागपूरच्या उत्तर व दक्षिण भागाला जोडणारे मेट्रोचे दोन मार्ग असणार आहेत. पहिला मार्ग 21किलोमीटरचा तर दुसरा 18 किलोमीटरचा असणार आहे. यामुळे शहरातील वाहतूकीची समस्या सुटण्यास मदत होईल अशी शक्यता वाहतूक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
मेट्रो प्रकल्पासाठी 3500 कोटी खर्च अपेक्षित आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकार निधी देणार आहेत. शहराची वाहन संख्या 10 लाखांच्या आसपास आहे. येणा-या काळात ती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेस्तेवाहतूकीवरील ताण लक्षात घेता शहरात मेट्रो रेल्वेची मागणी ब-याच दिवसापासून होत आहे.