आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात हेल्मेटशिवायही मिळणार पंपावर पेट्रोल, सरकार नमले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यात ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ निर्णयात राज्य सरकारने दुरुस्ती केली असून विनाहेल्मेट दुचारीस्वारांना पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळेल, परंतु अशा वाहनांचे क्रमांक पेट्रोलपंपचालक संबंधित प्रादेशिक/ उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना (आरटीओ) कळवतील, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.

राज्यात १ ऑगस्टपासून ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार होती. मात्र पेट्रोल पंपचालकांनी राज्य सरकारच्या या निर्णयास कडाडून विरोध केला. पेट्रोल पंपचालकांनी तर बेमुदत संपाचाही इशारा दिला होता. त्यामुळे निर्णयाच्या अंमलबजावणीची व्यवहार्यता तपासून पाहिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी म्हटले होते.
आमचा हेतू चांगला होता असे सांगत रावते यांनी शुक्रवारी सुधारित निर्णय जाहीर केला. ‘नो पेट्रोल, नो हेल्मेट’ धोरणाबाबत विधानसभेत चर्चा होऊन मुख्यमंत्र्यांनी याबाबत मार्ग काढावा असे सूचित केले. त्यानुसार पेट्रोल पंपचालकांनी हेल्मेट परिधान न केलेल्या दुचाकीस्वारास पेट्रोल दिल्यानंतर अशा वाहनांचे क्रमांक संबंधित प्रादेशिक/ उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यास कळवावे. ही माहिती देण्याची वारंवारिता व पद्धत संबंधित आरटीओ ठरवून देतील, असे रावते म्हणाले.
नेमके काय झाले...
> न्‍यायालयाच्‍या आदेशाचे पालन म्‍हणून राज्‍यात दुचाकीस्‍वरांना सर्वत्र हेल्‍मेटसक्‍ती आहे.
> असे असताना बहुतांश दुचाकी चालक हेल्‍मेट परिधान करत नाहीत.
> त्‍यामुळेच या कायद्याची अंमलबजावणी व्‍हावी, यासाठी परिवहन विभागाने 21 जुलै रोजी 'नो हेल्‍मेट नो पेट्रोल'चा निर्णय केला.
> हा नवीन नियम 1 ऑगस्‍टपासून लागू होणार होता.
> तसेच या नियमाकडे दुर्लक्ष करून पेट्रोल विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही सरकारने दिला होता.
> त्यामुळे या विरोधात फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल-डिझेल असोसिएशनने राज्यभर पेट्रोल-डिझेल खरेदीच बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
> राज्यभरात चार हजार ५०० डीलर्स या आंदोलनात सहभागी होणार
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, रस्ते अपघात : मृत्यूचे प्रमाण (२०१५)