आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Government Thinking Of Ban On Use Of Plpastic

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यात प्लास्टिक बंदी विचाराधीन : मुख्यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- वाढते शहरीकरण, प्लास्टिक यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे. यासाठी प्लास्टिकवर बंदी घालण्याचा शासन विचार करीत असल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केली.
महाराष्ट्र पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे जागतिक पर्यावरण दिन सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना मुख्ममंत्र्यांनी म्हटले की, पर्यावरणाच्या रक्षणासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी कठोर कायदे केले आहेत. परंतु पर्यावरण विरुद्ध विकास असा विरोधाभास निर्माण होत असून पर्यावरण संतुलन आणि विकास असा संतुलित शाश्वत विकास करणे महत्त्वाचे आहे.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री संजय देवतळे, पर्यावरण राज्यमंत्री सचिन अहिर, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे, पर्यावरण सचिव वल्सा नायर सिंह, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य सचिव मिलिंद म्हैसकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, प्लास्टिकमुळे पर्यावरणास बाधा निर्माण होत असल्याने संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी घालण्याबाबत शासन विचार करीत असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर विचार करून निर्णय घेण्यात येईल. उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत कारवाई करावी असे सांगून पर्यावरणावर परिणाम होणारे कुठलेही कारखाने असतील तर त्यावर कडक कारवाई करावी असे म्हटले.