आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Government To Bring Out New Textile Policy

नवीन वस्त्रोद्योग धोरणांतर्गत मराठवाडा-विदर्भाला मिळणार १२ कोटी रुपयांचा निधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्य सरकारने नवीन वस्त्रोद्योग धोरण तयार केले आहे. या नव्या धोरणाचा विदर्भ-मराठवाड्याला जास्तीत जास्त लाभ होण्याची शक्यता दिसून येत आहे. राज्य सरकारही यासाठी विशेष प्रयत्न करत असून १० टक्के भांडवली सवलतीअंतर्गत १२ कोटी रुपये वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठवाडा- विदर्भातील २७ वस्त्रोद्योग कारखान्यांना याचा फायदा होणार आहे.

सरकारने नव्या वस्त्रोद्योग धोरणात विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील नवीन व विस्तारीकरणाच्या २७ वस्त्रोद्योग घटकांना १० टक्के भांडवली सवलत देण्याची घोषणा केली होती. खरे तर अाघाडी सरकारमधील पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी या धोरणाला विरोध करण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता. कापूस विदर्भात होत असला तरी सूतगिरण्या पश्चिम महाराष्ट्रात असल्याने पश्चिम महाराष्ट्राचाही या धोरणात समावेश करावा, अशी मागणी सातत्याने केली जात होती. मात्र या धोरणामुळे मराठवाडा-विदर्भात ४० हजार कोटींची गुंतवणूक होणार असून ११ लाख नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. राज्यात साधारणत: ९२ लाख गाठी कापसाचे उत्पादन होते. मात्र, त्यापैकी फक्त २० लाख गाठींवरच राज्यात प्रक्रिया होते. नव्या धोरणामुळे मराठवाडा-विदर्भात प्रक्रिया उद्योग सुरू हाेऊन शेतकऱ्यांना लाभ हाेईल.

या कंपन्यांना मिळणार लाभ
औरंगाबाद : मूलचंद फायबर
जालना : लक्ष्मी कॉट स्पिन, मीनाक्षी फायबर
अमरावती : श्याम इंडोफेबचे ३ युनिट
परभणी : व्यंकटेश कॉटन
अहमदनगर : साकेत कॉटन
नंदुरबार : नारायण कोटेक्स
वर्धा : धनराज कॉटन
यवतमाळ : साई जिनिंग, ऋषी ट्रेडर्स
बीड : श्री काल्का फायबर्स
धुळे : जगन्नाथ एक्स्ट्रुशन