आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Government To Introduce Cleaning Angel Concept

राज्यात खेडोपाडी स्वच्छता दूत, निम्म्या जागी महिला, २२ हजार रुपये वार्षिक वेतन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यात पाच वर्षांत ५६ लाख शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रत्येक खेड्यात ‘स्वच्छता दूता’ची नियुक्ती करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. त्यापैकी निम्म्या महिला असतील. त्यांना २२ हजार रुपये वार्षिक वेतन देण्यात येईल.

पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर म्हणाले, उघड्यावर शौचाची प्रथा बंद करण्यासाठी ‘स्वच्छता दूतां’ची नियुक्ती केली जाईल. खेडे मोठे असेल तर दुस-या स्वच्छता दूताची नियुक्ती होईल. शौचालय बांधल्यानंतर त्यांना वेतनाच्या अर्धी आणि लोकांनी उघड्यावर शौच करणे थांबवले तरच उर्वरित रक्कम मिळेल. प्रत्येक शौचालयासाठी केंद्र ९ हजार, तर राज्य तीन हजार रुपये देईल.
निवडीची पद्धत
ग्रामपंचायतीने स्वच्छतादूतासाठी नाव सुचवायचे आहे. त्यांची छाननी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व नंतर राज्य सरकार करेल. आठवी पास ही शैक्षणिक पात्रता असेल.