आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपट पुरस्कार साेहळा यंदा खासगी खर्चाने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शासनातर्फे देण्यात येणाऱ्या चित्रपट क्षेत्रातील पुरस्कारांची घाेषणा साेमवारी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केली. राज्यातील शेतकरी अडचणीत असताना आणि राज्याची आर्थिक स्थिती खालावलेली असताना चित्रपट सोहळ्यावर सरकारी खर्च करण्याऐवजी यंदा पहिल्यांदाच हा चित्रपट पुरस्कार सोहळा खासगी प्रायोजकांमार्फत साजरा केला जाणार असल्याचे ते म्हणाले. कलर्स मराठी या वाहिनीतर्फे या सोहळ्याचा पूर्ण खर्च करण्यात येणार अाहे. तसेच या कार्यक्रमाचा पंधरा लाख रुपयांचा जाहिरातीचा कालावधीही राज्य सरकारला बहाल करण्यात आला आहे.

पुरस्कार वितरण साेहळा ३० एप्रिल रोजी पुण्याच्या गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सायंकाळी साडेसहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. याच वेळी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त कोर्ट, किल्ला, मित्रा आणि ख्वाडा या मराठी चित्रपट कलावंत आणि तंत्रज्ञांचाही सन्मान करण्यात येणार असल्याचे तावडे म्हणाले.

या विशेष पुरस्कारांसोबत ५२ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या अंतिम फेरीतील जाहीर झालेले अन्य पुरस्कारांचीही घाेषणा करण्यात अाली. त्यात उत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा पुरस्कार तेजस मोडक, प्रशांत बिडकर आणि अजय शर्मा यांना जाहीर झाला.
उत्कृष्ट छायालेखन - देवेंद्र गोलतकर, उत्कृष्ट संकलन - जयंत जठार, उत्कृष्ट ध्वनीमुद्रण - प्रमोद थॉमस, उत्कृष्ट वेशभुषा - भाऊसाहेब शिंदे , उत्कृष्ट रंगभूषा - राजू आंबूलकर, उत्कृष्ट जाहिरात - हिमांशू नंदा आणि राहुल नंदा, उत्कृष्ट बालकलाकार - आशुतोष गायकवाड यांचा समावेश अाहे.

अंतिम फेरीतील चित्रपट नामांकने :
एलिझाबेथ एकादशी, नागरिक, लोकमान्य - एक युगपुरूष, ख्वाडा, हॅपी जर्नी, एक हजाराची नोट, सुराज्य, सलाम, रमा माधव आणि पोस्टर बॉईज या दहापैकी पाच चित्रपटांना पुरस्कार प्राप्त होतील.

प्रथम पदार्पण दिग्दर्शनासाठी नामांकने : पोस्टर बॉईज , नागरिक आणि ख्वाडा

प्रथम पदार्पण चित्रपट निर्मितीसाठी नामांकने : काकण, दुसरी गोष्ट आणि ख्वाडा