Home »Maharashtra »Mumbai» Maharashtra Govt. Cabinet Reshuffle May After Gujarat Assembly Election

राज्य मंत्रिमंडळ विस्तार गुजरात निवडणुकीमुळे लांबणीवर, आता नव्या वर्षात संक्रांतीचा मुहूर्त?

दिव्यमराठी वेब टीम | Nov 14, 2017, 10:31 AM IST

  • फडणवीस यांनी विस्तार होणार असल्याचे म्हटले होते. मात्र, आता विस्ताराबाबत कोणत्याही हालचाली दिसत नाहीत.
मुंबई- राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार होणार असे बोलले जात असले तरी तो पुन्हा एकदा पुढे ढकलल्याचे बोलले जात आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने गुजरातच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे पक्षाध्यक्ष अमित शहांना वेळ नाहीये तर, दुसरीकडे पक्षाच्या विरोधात तयार होत असलेले वातावरण पाहून भाजपने गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विधानसभेचे निवडणूक निकाल येईपर्यंत वाट पाहण्याचे ठरविल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे.
भाजपच्या राज्य कोअर कमिटीची सोमवारी रात्री मुंबईत बैठक पार पडली. यावेळी त्यावर साधकबाधक चर्चा झाली मात्र, ठोस असे काहीही ठरले नाही. दरम्यान, नारायण राणे यांच्याबाबत भाजपने कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा गुजरातमध्ये पूर्णवेळ बिझी आहेत. त्यामुळे इतर विषयांकडे पाहायला त्यांना वेळ नाही. राज्यातील काही नेते गुजरातमधील निवडणुकीसाठी प्रचार करत आहेत. त्यामुळे राज्यातील फडणवीस सरकारचा विस्तार आता पुढे ढकलला जाणार असल्याचे भाजपमधील सूत्रांचे म्हणणे आहे. गुजरात व हिमाचलचे निकाल 18 डिसेंबरला येणार आहेत. तर राज्य विधीमंडळाचे अधिवेशन 11 डिसेंबरनंतर सुरू आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला नव्या वर्षात तेही मकर संक्रांतीनंतरचा मुहूर्त लागेल असे भाजपमधील नेत्यांचे म्हणणे आहे.
गुजरातमध्ये काँग्रेसला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून भाजप धास्तावलेली आहे. गुजरातचे निकाल विरोधात किंवा अपेक्षित लागले नाही तर पक्षाला बराच धोरणात्मक बदल करावा लागण्याची चिन्हे आहेत. मोदी-शहांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये पक्षाला झटका बसला विरोधकांना मोठे बळ मिळेल. परिणामी 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींना गांभीर्यानेच पाहावे लागेल. पुढील वर्षी मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, छत्तीगड आदी महत्त्वाच्या राज्यात विधानसभेच्या निवडणूका होत आहेत. त्यासाठी मोदी-शहांसाठी गुजरातची निवडणूक फार महत्त्वाची आहे. गुजरातमध्येच धोबीपछाड मिळाला तर पक्षातंर्गत विरोधकही डोके वर काढू शकतात. यशवंत सिन्हा, नाना पटोले, शत्रूघ्न सिन्हा आदींसारखे नेत्यांचा आवाज वाढू शकेल. अशा पार्श्वभूमीवर मोदी-शहा सावध पावले टाकत आहेत.
महाराष्ट्र राज्याबाबत बोलायचे झाल्यास शेतकरी कर्जमाफीवरून शेतक-यांत नाराजी आहे. जीएसटी, अर्थव्यवस्थेसह रोजगारीचे प्रश्न ऐरणीवर आहेत. सोबत सत्तेत असलेला शिवसेना मित्रपक्ष मोदी-शहांवर रोजच हल्ले करत आहे. नारायण राणेंना मंत्रिमंडळात घेणार असल्याचे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी खुलेआम सांगत असल्याने सेनेचा विरोध आणखी कडवा होण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही तर राणेंबाबत आस्ते कदम घेऊन आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेशी जुळवून घेण्याबाबत भाजपला गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. गुजरात निकालासोबत राणेंचे करायचे काय या कारणामुळे राज्यातील फडणवीस सरकारचा विस्तार रखडला जाऊ शकतो असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती...

Next Article

Recommended