आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Govt And Foxconn Company MoU Signing In Mumbai, Cm Fadanvis & Foxconn Chairman Mr Terry Gou Signning

महाराष्ट्र सरकार-फॉक्सकॉनदरम्यान सामंजस्य करार, आयफोन राज्यात तयार होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कंपनीचे अध्यक्ष टेरी गो आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या करारावर स्वाक्ष-या केल्या. - Divya Marathi
कंपनीचे अध्यक्ष टेरी गो आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या करारावर स्वाक्ष-या केल्या.
मुंबई- चीन (तैवान)मधील आघाडीची कंपनी फॉक्सकॉन आणि राज्य सरकार यांच्यात आज सामंजस्य करारावर स्वाक्ष-या झाल्या. कंपनीचे अध्यक्ष टेरी गो आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या करारावर स्वाक्ष-या केल्या. सौरऊर्जेवरील डेटा सर्व्हर स्टोरेजच्या उभारणीसह मोबाईल, टॅब्लेट, टीव्ही इत्यादी क्षेत्रात फॉक्सकॉन समूह राज्यात गुंतवणुक करणार आहे. मोबाइलमधील हरित तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही गुंतवणुकीची तयारी कंपनीने दाखवली आहे.
फॉक्सकॉन कंपनी सध्या अॅपलसह सोनी, नोकियासह अनेक कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक उत्पादने बनवते. जगभरातील बहुतेक कंपन्यांना ही कंपनी संगणकाचे सुटे साहित्याचे उत्पादन पुरवते. चीनमध्ये या कंपनीने लोकांना सर्वाधिक रोजगार दिला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रॅंड बनलेले गजेटचे उत्पादन महाराष्ट्रात होणार आहे. कंपनीला मुंबई व पुणे पट्ट्यात तळेगाव येथे दीड हजार एकर जागा देण्यात आली आहे. फॉक्सकॉन कंपनी सुमारे 31 हजार कोटी रूपयांची गुतंवणूक करणार आहे. जमिनीसह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे.
मे महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह चीनचा दौरा केला होता. त्यावेळी फॉक्सकॉन कंपनीने राज्यात गुंतवणूकीची तयारी दर्शवली होती. अखेर आज राज्य सरकार आणि फॉक्सकॉन यांच्यातील करार मार्गी लागला आहे.
फॉक्सकॉन कंपनीने आता कामगारांच्या जागी रोबोट ठेवण्याचा अभिनव प्रस्ताव तयार केला आहे. सध्या 1. 2 दशलक्ष कर्मचारी या कंपनीत काम करतात. यातील एक दशलक्ष हे चीनमधील आहेत. सध्या कंपनीकडे 10 हजार रोबोट आहेत. पुढील एक वर्षात ही संख्या 3 लाखांच्या घरात तर तीन वर्षात हा आकडा एक 10 लाखांपर्यंत नेण्याचा कंपनीचा मानस आहे.