आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Govt Appointed Nodal Officer For Dialogue To Buy Babasaheb's London Home

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडन येथील वास्तु खरेदीसाठी नोडल ऑफिसरची नियुक्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन येथे वास्तव्य केलेले किंग्ज हेन्‍री रोडवरील एन डब्ल्यू 3 ही वास्तु खरेदी करण्यासंदर्भातील सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करुन 14 एप्रिल 2015 पर्यंत ही वास्तु खरेदी करण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. ही कायदेशीर प्रक्रीया पुर्ण करण्यासंदर्भात लंडन येथील उच्चायुक्त कार्यालयात स्वतंत्र नोडल ऑफिसर नेमण्यात आला आहे, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन येथे वास्तव्य केलेल्या वास्तुच्या खरेदी प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी बडोले यांच्या दालनात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
सामाजिक न्यायमंत्री बडोले म्हणाले की, लंडन येथील ही वास्तु खरेदीसाठी व त्या वास्तुचे जतन करण्यासाठी येणारा खर्च राज्य शासन करणार आहे. या प्रक्रियेसाठी माझ्या (सामाजिक न्यायमंत्र्यांच्या) अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सचिवांनी लंडन येथील भारतीय उच्चायुक्तांशी चर्चा करून लंडन येथील उच्चायुक्त कार्यालयात नोडल ऑफीसर नेमण्याची मागणी केली होती. त्यानुसार लंडन येथील भारतीय उच्चायुक्तांनी या प्रक्रियेत राज्य शासनाला सहकार्य व मार्गदर्शन करण्यासाठी नोडल ऑफीसर नेमण्यात आला आहे.
या नोडल ऑफिसरच्या माध्यमातुन वास्तुची किंमत व टायटल संदर्भात राज्य शासनास मार्गदर्शन, भारत व इंग्लंड येथील कायदेशीर विषयक तरतुदीनुसार विहित प्रक्रिया पार पाडण्यासाठी, वास्तु खरेदी प्रक्रियेत राज्य शासनाच्या संपर्कात असलेल्या मे. सेडॉन या सॉलिसिटर संस्थेची अधिकृतता तपासणे या कायदेशीर बाबींची तपासणी करण्यात येणार आहे, असेही बडोले यांनी सांगितले.