आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- राज्यात अखेर फडणवीस सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. योगेंद्र यादव यांच्यापासून शरद पवारांपर्यंत सर्वच नेत्यांनी राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. तसेच सरकारने केलेल्या उपाययोजनांची अमलबजावणी करण्याची मागणी लावून धरली होती. अखेर आज महसूल व कृषीमंत्री एकनाथ खडसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत या निर्णयावर मोहोर उमटविण्यात आली. राज्यातील 14,708 गावांची पैसेवारी 50 टक्क्यांपेक्षा कमी आहे. या सर्व गावांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
दुष्काळ जाहीर झाल्याने या गावांना दुष्काळी उपाययोजना करताना कृषी पंपाच्या चालू बीज बीलामध्ये 33.5 टक्के सवलत, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ, जमीन महसूलात सूट, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्स आणि टंचाई जाहिर झालेल्या गावातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज खंडीत न करणे असे निर्णय घेण्यात आले आहेत. या उपाययोजना लागू करताना गाव हा घटक मानण्यात येईल. राज्यातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता कापूस तसेच सोयाबीन, मका, धान खरेदी केंद्र तातडीने सुरु करावेत, असे निर्देश महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी आज येथे दिले.
- 14,708 गावांची पैसेवारी 50 टक्क्यांपेक्षा कमी
- कृषी पंपाच्या चालू बीज बीलामध्ये 33.5 टक्के सवलत
- शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ
- कापूस तसेच सोयाबीन, मका, धान खरेदी केंद्र तातडीने सुरु होणार
पुढे आणखी वाचा, दुष्काळबाबत कृषि व महसूलमंत्री एकनाथ खडसे काय म्हणाले...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.