आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Govt The Stock Limit On Oilseeds, Edible Oils And Pulses.

महागाईविरोधात मुंबईत सर्वपक्षीय आंदोलन; डाळी साठ्यांवर निर्बंध, पुण्यात कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वाढत्या महागाईला आळा घालण्यात राज्यातील फडणवीस सरकारसह केंद्रातील मोदी सरकारला मोठे अपयश आल्याने या महागाई विरोधात आज मुंबईत सर्वपक्षीय आंदोलन पुकारण्यात आले. मुंबई काँग्रेस आणि मुंबई महिला काँग्रेसच्या वतीने डाळी, कडधान्ये आणि भाज्यांच्या वाढत्या किंमतींविरोधात थाळी-लाटणे (बेलणे) मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती.
मुंबईतील वांद्रे पूर्व खेरवाडी सिग्नलपासून सुरु झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेला. राज्यात सत्तेत असलेली शिवसेनेही या आंदोलनात अप्रत्यक्ष पाठिंबा देऊन डाळींच्या वाढत्या दरावरुन भाजपला लक्ष्य केले. त्याचाच भाग म्हणून सांताक्रुज येथील रिलायन्स मॉल बाहेर शिवसेनेकडून स्वस्त तूरडाळ विकण्यात येणार आहे. तर मनसेही महागाईच्या आंदोलनात सहभागी घेतला. बोरिवली विभागात मोर्चा काढून वाढत्या महागाईबद्दल मनसेने भाजप सरकाचा निषेध केला.
डाळी, खाद्यतेले आणि खाद्य तेलबियांची साठेबाजी व काळाबाजारास आळा घालण्यासाठी आज राज्य सरकारने कडक पावले उचलली असून केंद्र सरकारने या वस्तुंसाठी लागू केलेल्या साठा निर्बंधाला अनुसरून राज्य सरकारनेही राज्यात डाळी, खाद्यतेले आणि खाद्य तेलबिया यांच्या साठवणुकीवर निर्बंध लागू केले आहेत. राज्यात हे निर्बंध 30 सप्टेंबर 2016 पर्यंत लागू असणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साठेबाजी व काळाबाजारास आळा घालण्याचे आदेश देताच पुण्यातील मार्केट यार्ड येथील 200 व्यापा-यांच्या दुकानावर धाडी टाकल्या आहेत. ही सर्व दुकाने सील केली आहेत.
पुढे पाहा छायाचित्रांच्या माध्यमातून मुंबईतील आजचे महागाईविरोधात सर्वपक्षीय आंदोलन...