आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Govt Will Take Steps To Boost Coastal Security Says Devendra Fadnavis

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सागरी सुरक्षेच्या नावाखाली मुख्यमंत्र्यांचे सहकुटुंब ‘पर्यटन’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सागरी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी गिरगाव चौपाटी ते वाशी दरम्यान सागरी सफर केली. विशेष म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या या दौर्‍यात मुख्यमंत्र्यांनी आपली पत्नी व मुलीलाही ‘सागरी पर्यटन’ घडवून आणल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी व अ‍ॅक्सेस बॅंकेच्या उपाध्यक्षा अमृता फडणवीस व मुलगी दिविजा यांनी मुख्यमंत्र्यांसोबत गिरगाव ते चौपाटी दरम्यान सागरी प्रवास केला. यावेळी उपस्थित असलेले सागरी तटरक्षक दलाचे अधिकारी या ‘पाहूण्यां’च्या तैनातीत होते. मात्र वाशीपर्यंत दौरा पूर्ण केल्यानंतर मुख्यमंत्री नंतर एकटेच ऐरोलीकडे रवाना झाले.

सागरी सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी नौदल आणि तटरक्षक दलाच्या सहकार्याने उपाययोजना कराव्या. तसेच सागरी मार्गाने होणारी अवैध वाहतूक आणि समुद्रमार्गाने येणारे दहशतवादी यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक सक्षम सागरी सुरक्षा व्यवस्था निर्माण करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले. त्यांच्यासमवेत नौदल व पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी तटरक्षक दल आणि राज्य सरकार यांची एक बैठक लवकरच घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

तिवरांची कत्तल रोखण्यासाठी सॅटेलाइट मॉनिटरिंग करणार
‘जागतिक वेटलँड डे’चे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी ऐरोलीच्या खाडी परिसरातल्या खारफुटी आणि तिवरांच्या जंगलांची पाहणी केली. तिवरांच्या कत्तलीबाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, ‘नक्कीच ही एक गंभीर गोष्ट असून त्या रोखण्यासाठी एक सक्षम यंत्रणा लवकरच उभी केली जाईल. आणि त्यावर नजर ठेवण्यासाठी उपग्रहांची मदत घेतली जाईल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.