आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाराेग्य मंत्र्यांचे खासगी सचिव सुनील माळी सक्तीच्या रजेवर!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सरकारी महिला डाॅक्टरशी आक्षेपार्ह संभाषण केल्याच्या आरोपावरून राज्याचे आरोग्यमंत्री डाॅ.दीपक सावंत यांचे खासगी सचिव सुनील माळी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. स्वत: सावंत यांनी ही कारवाई केली. मात्र या कारवाईबद्दल महिला डाॅक्टरांचे समाधान झालेले नाही. माळी यांचे निलंबन व्हायला हवे, अशी मागणी त्यांनी केली, तसे न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे.

पातोंडा (ता.चाळीसगाव जि. जळगाव) येथील वैद्यकिय अधिकारी डाॅ. मनीषा महाजन या सरकारी उपक्रम राबवण्याबाबत माहिती घेण्यासाठी अाराेग्य मंत्री दीपक सावंत यांच्या कार्यालयात आल्या होत्या. मात्र हा उपक्रम राबवण्यासाठी तुम्हाला ‘गाॅडफादरची’ गरज आहे. याशिवाय तुम्ही सरकार दरबारी हा उपक्रम करू शकत नाही, असे माळी यांनी सांगून आपणास मंत्र्यांच्या अँटी चेंबरमध्ये दोन तास बसवून ठेवण्यात आले, अशी तक्रार डाॅ. महाजन यांनी केली हाेती. तसेच या घटनेचा धक्का बसलेल्या डाॅ.महाजन यांनी मरीन लाईन्स पाेलिस स्थानकात तक्रारही केली. मात्र पाेलिसांनी माळींवर एफआयआर दाखल करण्यास टाळटाळ केल्याचा अाराेपही त्यांनी केला अाहे.

‘अाधी मरीन लाईन्स पाेलिस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी आपली तक्रार दाखल करून घेण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र पाेलिस स्थानकात फोन येताच त्यांनी टाळटाळ केली. सरकारी अधिकाऱ्यांना अाणि त्यातही महिला डाॅक्टरांनाच या राज्यात न्याय मिळणार नसेल तर सामान्य लोकांना काय त्रास सहन करावा लागत असेल, याची कल्पना न केलेली बरी’, अशी प्रतिक्रिया डाॅ.महाजन यांनी व्यक्त केली. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही पाठवले आहे.
बातम्या आणखी आहेत...