मुंबई - महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न उच्चाधिकार समितीची पुनर्रचना सोमवारी करण्यात आली असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या समितीचे अध्यक्ष असणार आहेत.
पुनर्रचित समिती सात सदस्यांची असून त्यात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री नारायण राणे, प्रा. एन. डी. पाटील, प्रा. राम कापसे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचा समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने करायच्या उपाययोजनांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार या समितीला आहेत. समितीची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार शासनाने याबाबतचा आदेश आज जारी केला आहे. बेळगाव, निपाणी परिसरातील 1100 गावांतील 25 लाख मराठीभाषक महाराष्ट्रात येण्याची वाट पाहत आहेत. कर्नाटक विधानसभेत मराठी एकीकरण समितीचे सध्या दोन आमदार आहेत.