आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Last Year Drought & Modi's Issued Notice

गुजरातच्या पशुखाद्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादी मोदींना घेरणार, भाजप नेत्यांची चुप्पी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या वर्षी महाराष्ट्रात पडलेल्या भीषण दुष्काळाच्या काळात गुजरातच्या दूध संस्थांनी महाराष्ट्राला दिलेल्या मोफत पशुखाद्याचे 22 कोटी रूपये परत मागितल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोदींसह भाजपला घेरण्याची रणनिती आखल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह आघाडीतील नेत्यांनी यावर मोदींच्या दुटप्पीपणाबद्दल सडकून टीका केली आहे. दरम्यान, याप्रकरणी भाजपने अद्याप चुप्पी साधली आहे. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी याबाबत मोदींची बाजू घेतल्यास मतदारांचा फटका बसेल त्यामुळे भाजपने यावर प्रतिक्रिया ने देण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या वर्षी गुजरातमधील मेहसाणा पशुखाद्यनिर्मिती संस्थेने महाराष्ट्रात दुष्काळ पडल्याने 400 लाख टन खाद्य मोफत दिले होते. मात्र, आता महाराष्ट्राला मोफत पशुखाद्य दिल्याने मोदी सरकारच्या सहकार विभागाने मेहसाणा संस्थेवर व व्यवस्थापनावर फौजदारी गुन्हे दाखल केले आहे. याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष विपुल चौधरी यांची हकालपट्टी केली आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातल्या दूध उत्पादक आणि दूध संघांची शिखर संस्था असलेल्या महानंद दूध संस्थेला पशुखाद्याचे 22 कोटी 50 लाख रुपये द्यावेत नाही तर आम्ही न्यायालयात जावू असा इशारा मेहसाणा संस्थेने दिला आहे. आता लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत याचे तीव्र पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटू लागले आहेत.
काय टीका केली आहे मोदींवर शरद पवार व आघाडीच्या इतर नेत्यांनी, वाचा पुढे...