आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅस सबसिडी साेडण्यात महाराष्ट्र क्रमांक एकवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- घरगुती गॅस सिलिंडरवरील शासकीय अनुदानाचा त्याग करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केलेल्या अावाहनाला सर्वाधिक प्रतिसाद महाराष्ट्रातील जनतेने दिला अाहे. देशातील एक काेटीहून अधिक ग्राहकांनी हे सरकारी अनुदान नाकारले अाहे. त्यात १६ लाखांहून अधिक ग्राहकांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राने देशात पहिला क्रमांक पटकावला अाहे.

राष्ट्रहितासाठी राज्यातील नागरिकांनी दिलेले हे योगदान अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली अाहे. देशात एकूण १४ कोटी ५४ लाख नागरिक एलपीजी गॅसधारक आहेत, त्यापैकी एक कोटीहून अधिक नागरिकांनी या अनुदानाचा त्याग केला आहे. महाराष्ट्रातील १६ लाख ४२ हजार ८१४ नागरिकांचा त्यात समावेश अाहे. महाराष्ट्रापाठाेपाठ उत्तर प्रदेश (१२ लाख ५३ हजार २४२), दिल्ली (७ लाख २७ हजार ३७४ ), कर्नाटक (६ लाख ९७ हजार ७१०) तामिळनाडू ( लाख ४७ हजार ९८५ ) याप्रमाणे पहिल्या राज्यांची क्रमवारी आहे. या पाचही राज्यांनी एकूण आकडेवारीत पन्नास टक्के वाटा उचलला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांनी " गिव्ह इट अप' मोहिमेला दिलेल्या उच्चांकी प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला असून राज्याचे हे योगदान अभिमानास्पद असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधानांचे स्वप्न साकारण्यासाठी महाराष्ट्रातील नागरिकांनी या उपक्रमात यापुढेही अधिक मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच या मोहिमेला मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल पेट्रोलियम नैसर्गिक वायू विभागाचे राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.