मुंबई - १९६० च्या प्राणी छळ प्रतिबंधक कायद्यान्वये राज्यातील शंकरपटावर सर्वोच्च न्यायालयाने घातलेली बंदी आता उठण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दरम्यान, विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सहा मार्चपासून सुरू होणार असून ते सात एप्रिलपर्यंत चालेल. शनिवार, १८ मार्चला दुपारी दोन वाजता राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाईल.
तामिळनाडू सरकारने अध्यादेशाद्वारे जल्लीकट्टूवरील बंदी उठवली तशीच शंकरपटावरील बंदीही उठवण्याची मागणी झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावर विचार करत असून येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंबंधीचे विधेयक मांडण्याची तयारी सुरू आहे.