आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधान परिषदेतून राणेंची माघार? भाजपकडून माधव भंडारी, शायना एनसी यांची नावे चर्चेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शायना यांच्यासाठी सर्व काही जुळून येऊ शकते मात्र, त्यांना राष्ट्रीय राजकारणात रस असल्याने राज्यसभेत जाण्यासाठी त्या प्रयत्न करतील असे बोलले जात आहे. - Divya Marathi
शायना यांच्यासाठी सर्व काही जुळून येऊ शकते मात्र, त्यांना राष्ट्रीय राजकारणात रस असल्याने राज्यसभेत जाण्यासाठी त्या प्रयत्न करतील असे बोलले जात आहे.

मुंबई- माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी विधान परिषदेतील आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या एका जागेसाठी येत्या 7 डिसेंबरला निवडणूक होत आहे. सत्ताधारी भाजपकडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांच्या नावाची चर्चा होती मात्र, त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता भाजपकडून उमेदवार कोण यावर खल सुरू आहे. प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी आणि पक्षाच्या कोषाध्यक्षा, प्रवक्‍त्या शायना एनसी यांची नावे समोर येत आहेत. मात्र, पक्ष ऐनवेळी या दोघांना डावलून एखादे नवेच नाव समोर आणू शकतो असे बोलले जात आहे.

 

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा देताना काँग्रेस पक्षामुळे मिळालेली विधान परिषदेतील आमदारकीही सोडली होती. या जागेची निवडणूक 7 डिसेंबरला होत असून, या जागेवर पुन्हा निवडून जाण्याचा राणेंचा प्रयत्न होता. मात्र, शिवसेनेने कडवा विरोध केल्याने व काँग्रेस-राष्ट्रवादीची या निवडणुकीसाठी आघाडी होत नसल्याने राणे यांनी थांबणे पसंत केले आहे. विधानसभेत वैभव नाईकांकडून पराभव झाल्यानंतर वांद्रे पोटनिवडणुकीतही राणेंना पराभवाची चव चाखावी लागली होती. आता सेना, राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र येत असल्याचे पाहून राणेंनी आणखी एक पराभव नको म्हणून माघार घेणे पसंत केले आहे. दरम्यान, राणेंनी माघार घेताच भाजपकडून इच्छूकांची नावे समोर येऊ लागली आहेत. यात माधव भांडारी, शायना एनसी, रत्नागिरी भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने, माजी आमदार प्रमोद जठार आदींच्या नावांची चर्चा आहे. मात्र, भांडारी व शायना यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते असे भाजपमध्ये चर्चा आहे.

 

भंडारी आणखी सहा महिने वाट पाहणार?

 

प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांची दावेदारी भक्कम मानली जाते. मात्र, सध्या त्यांच्या बाजूने गणित जुळण्याची शक्यता कमीच आहे. भाजपला किमान 8-10 मतांची बेगमी करावी लागणार आहे. त्यासाठी अपक्षांना किंमत मोजणारा नेता हवा आहे. यात भांडारी कमी पडत आहेत. शिवाय शिवसेनेच्या विरोधात वारंवार भूमिका मांडणारा व उद्धव ठाकरेंची खिल्ली उडविण्यात भांडारी कधीही मागे हटले नाहीत. त्यामुळे शिवसेना भांडारीच्या नावाला पसंती देईल अशी शक्यता नाही. सोबत पुढील सहा महिन्यात विधान परिषदेच्या 11 जागा रिक्त होत आहेत. त्यामुळे भांडारी आणखी सहा महिने वाट पाहणे पसंत करतील असे बोलले जाते. भांडारी यांना दोन वर्षापूर्वीपासून विधान परिषदेवर पाठविण्याबाबत चर्चा होती मात्र प्रत्येक वेळी काहींना काही अडचण तयार झाली आणि त्यांचे नाव मागे पडत गेले. पुन्हा आता एकदा भाजपला विजय खेचून आणायचा असेल तर आर्थिक ताकदीचा उमेदवार शोधावा लागू शकतो.

 

शायना एनसी यांना विधान परिषदेत नव्हे राज्यसभेत रस-

 

भाजपच्या कोषाध्यक्षा व प्रवक्त्या शायना एनसी यांचेही नाव नेहमीप्रमाणे आघाडीवर आहे. शिवसेनेचा पाठिंबा मिळविण्यासाठी भाजप शायना एनसी यांचे नाव पुढे करू शकते. मात्र, खुद्द शायना एनसी यांना विधान परिषदेत नव्हे तर राज्यसभेत रस आहे. तरीही पक्षाने जोर केल्यास त्यांना नाईलाजाने विधान परिषदेत जावे लागू शकते. शायना एनसी आणि शिवसेनेतील संबंध चांगले आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे शायना यांच्या उमेदवारीला पाठिंबा देतील असा भाजपमधील धुरिणींना अंदाज आहे. पण शायना यांना राष्ट्रीय राजकारणात रस आहे. बहुतेक वेळा त्या राष्ट्रीय मुद्यांवर बोलत असतात किंवा पक्षाची बाजूही त्या राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवरच मांडताना दिसतात. जून-जुलै 2018 मध्ये राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. सध्याच्या संख्याबळाचा विचार करता भाजप त्यातील तीन जागा आरामात जिंकू शकते. त्यामुळे भांडारी यांच्याप्रमाणेच शायना या सुद्धा राज्यसभेत जाण्यासाठी आणखी सहा महिने थांबू शकतात. 

 

भांडारी- शायना नसतील तर मग भाजपकडून कोण?

 

माधव भांडारी व शायना यांच्या वेगवेगळ्या अडचणी आहेत. त्यामुळे भाजप या दोघांऐवजी वेगळाच उमेदवार समोर आणू शकतो. भाजपला कोकणात पाय रोवायचे आहेत. रत्नागिरी भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळा माने पक्षाचे मागील अनेक वर्षे काम पाहत आहेत. मात्र, शिवसेनेमुळे त्यांना कधी माघार घ्यावी लागली तर जेव्हा निवडणूक लढले तेव्हा पराभूत झाले. अशा वेळी भाजप बाळ माने सारख्या निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी देऊ शकतो. राणेंची भाजप पक्षात मागच्या दारातून का होईना एंट्री झाल्याने नाराज असलेले व शिवसेनेला कधीही आपलेसे करण्याची शक्यता असलेल्या प्रमोद जठार यांनाही भाजपकडून संधी दिली जाऊ शकते. याशिवाय मुंबई भाजपातून प्रसाद लाड यांच्यासारख्या एखादे तगडे नाव समोर येऊ शकते जो अपक्षांना किंमत चुकवू शकेल.

 

पुढे स्लाईडद्वारे वाचा, यासंदर्भातील माहिती...

बातम्या आणखी आहेत...