आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषदेसाठी टकले, पावसकर, ठाकुरांना उमेदवारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नुकतेच भाजपत गेलेले संजय काका पाटील यांच्या जागेवर विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने आनंद ठाकूर यांना उमेदवारी देत ठाणे तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघातील उत्तर भारतीय मतांची बेगमी केल्याचे स्पष्ट दिसत आहे. तसेच पक्षाचे खजिनदार हेमंत टकले व किरण पावसकर यांनाही पुन्हा संधी देण्यात आली आहे.

विधानसभा सदस्यांमधून निवडून जाणार्‍या 9 जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी आपले तीन उमेदवार जाहीर केले. ठाणे बेलापूर हा प्रचंड मोठा मतदारसंघ असून येथे उत्तर भारतीयांची संख्या मोठी आहे. तीच गोष्ट कल्याणची. हे दोन्ही मतदारसंघ 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने शिवसेनेकडून खेचून आणले होते. आपल्या बालेकिल्लय़ांना पडलेले भगदाड भरून काढण्यासाठी शिवसेनेनेही या वेळी कंबर कसल्यामुळे राष्ट्रवादीला आपली सारी ताकद पणाला लावावी लागणार आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर यांना उमेदवारी दिल्याची चर्चा आहे. हेमंत टकले हे शरद पवारांचे विश्वासू आहेत तर शिवसेनेतून आलेले किरण पावसकर उपमुख्यमंत्री यांच्या र्मजीतील नेते समजले जातात.