आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra May Challenge Lifting Of Ban On Maggi

मॅगीवर बंदीबाबत राज्य सरकार ठाम; सर्वोच्च न्यायालयात जाणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पाच महिन्यांच्या बंदीनंतर उच्च न्यायालयाने मॅगीवरील बंदी उठवली असली तरी राज्य सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (एफडीए) मात्र मॅगीवरील बंदी कायम ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

देशातील तीन प्रयोगशाळांतील चाचणीत मॅगी खाण्यालायक असण्याचा अहवाल देण्यात आला होता. या अहवालाच्या आधारे नेस्ले या कंपनीने उच्च न्यायालयातील दावा जिंकला होता. मात्र न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत. ‘एफडीए’च्या मते या अटीच मॅगीवर बंदी घालण्यासाठी पुरेशा आहेत. त्याच आधारावर या निर्णयाला आव्हान दिले जाणार आहे.

मॅगीने स्वत:च तीन नमुने काढून वेगवेगळ्या प्रयोगशाळेत तपासून घेतले होते आणि त्या निर्दोष अहवालाच्या जोरावर न्यायालयीन लढाई जिंकली. पण, एफडीएला हे मान्य नाही. एखाद्या कंपनीला आपल्या उत्पादनाबद्दल खात्री असल्यास ते रेफरल प्रयोगशाळेतून चाचणी करून घेण्यासाठी एफडीएकडे अर्ज करतात. रेफरल प्रयोगशाळा गाझियाबाद येथे असून येथे चाचणी यशस्वी झाल्यानंतर त्या उत्पादनाबाबत पुन्हा शंका घेता येत नाही. मात्र मॅगीने सुरुवातीपासून रेफरल चाचणी घेण्यास टाळाटाळ केली आहे.