आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लीजच्या जमिनी विकून ५० हजार काेटी उभारणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लीजवर दिलेले भूखंड, जमिनी विकून महसूल उभारणीचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यादृष्टीने सध्या जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या जमिनीचे हस्तांतरण सुलभ होण्यासाठी महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापली आहे. असे झाले तर सरकारला सुमारे ५०,००० कोटी रुपयांचा महसूल उभा करता येईल. लीजबाबत ज्यांचा करार संपला आहे त्याचे नूतनीकरण करावे, अन्यथा त्यांच्या जमिनी सरकार परत घेईल, अशी सूचना दिली आहे.

अनेक अडचणी
लीजवरील जमिनी विक्री करायचे ठरले तर त्यात अनेक अडचणी असल्याचे महसूल विभागातील सूत्रांनी सांगितले. अनेक रुग्णालयांना अशा जमिनी दिल्या आहेत. समजा त्या मुक्त झाल्या तर त्यातील २० टक्के खाटांचा कोटा रद्द होईल.
बातम्या आणखी आहेत...